औंढा नागनाथ : येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची २१ मे रोजी तिथीप्रमाणे जयंती साजरी करण्यात आली. जयंती कार्यक्रमास मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. औंढा येथील नागनाथ मंदिराच्या बाजूस असलेल्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. जयंती कार्यक्रमास धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. विलास खरात, नागनाथ संस्थानचे निळकंठ देव, विश्वस्त साहेबराव देवकते, गंगाधर देवकते, नागनाथ मंदिर संस्थानचे व्यवस्थापक वैैजनाथ पवार, अमर नाईक, मारोती सोनुने, महेश खुळखुळे, हाके, सुनील पोले, नितीन पोले आदी उपस्थित होते. या प्रसंगी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी परिसरातील समाज बांधव उपस्थित होते. (वार्ताहर)
अहिल्याबाई होळकर यांची जयंती
By admin | Updated: May 22, 2014 00:35 IST