शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
4
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
5
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
6
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
7
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
8
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
9
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
10
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
11
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
12
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा
13
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
14
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
15
शुबमन गिलचा एक मेसेज अन् तो सासरवाडीतून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात (VIDEO)
16
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
17
Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा डाव साधणार का?
18
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर
19
HDB Financial Services IPO : १२,५०० कोटींचा HDB Financial IPO हिट, बंपर प्रतिसाद; अलॉटमेंट कसं चेक कराल?
20
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...

शंभर रेशन दुकानांत एप्रिलपूर्वी बायोमेट्रिक

By admin | Updated: December 12, 2014 00:55 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात येत्या मार्चअखेरपर्यंत आणखी शंभर रेशन दुकानांवर बायोमेट्रिक पद्धत लागू करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी सांगितले.

औरंगाबाद : अन्नधान्य आणि साखरेच्या काळ्याबाजाराला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात येत्या मार्चअखेरपर्यंत आणखी शंभर रेशन दुकानांवर बायोमेट्रिक पद्धत लागू करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी सांगितले. शासनाकडून स्वस्त धान्य दुकानांमार्फत दर महिन्याला सवलतीच्या दरात गहू, तांदूळ, साखर, केरोसिनचा पुरवठा केला जातो; मात्र यामध्ये तेवढ्याच मोठ्या संख्येने काळा बाजार होतो. अनेक दुकानदार लाभार्थ्याला धान्य न देताच कागदोपत्री दिल्याचे दाखवून काळ्या बाजारात विकतात. याला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दीड वर्षासाठी प्रायोगिक तत्त्वावर बायोमेट्रिक पद्धत लागू केली. लाभार्थ्याच्या अंगठ्याचा ठसा जुळल्यानंतरच त्याला अन्नधान्य देण्याची तरतूद यामध्ये आहे. या बायोमेट्रिक मशीन मुंबईतील सर्व्हरशी आॅनलाईन जोडल्या गेलेल्या आहेत, त्यामुळे कोणत्या लाभार्थ्याने धान्य उचलले किंवा कोणी उचलले नाही, हे समजते. सध्या जिल्ह्यात २९ दुकानांवर ही पद्धत लागू करण्यात आली आहे; मात्र लवकरच त्याचा विस्तार करण्यात येणार असून मार्चअखेरपर्यंत जिल्ह्यातील आणखी १०० रेशन दुकानांवर बायोमेट्रिक मशीन बसविल्या जाणार आहेत. सर्व तालुक्यांच्या ठिकाणी किमान दहा ते बारा दुकानांवर हे लागू केले जाईल, असेही जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी आज सांगितले.