शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बीड बायपासवर दुचाकीस्वाराचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 00:33 IST

बीड बायपासवरील बाळापूरजवळील गुरुप्रसादनगर येथे दुचाकी व मालवाहतूक करणाºया वाहनाची धडक लागून एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बीड बायपासवरील बाळापूरजवळील गुरुप्रसादनगर येथे दुचाकी व मालवाहतूक करणाºया वाहनाची धडक लागून एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.जनार्दन शिरसाट (५५, रा. वाकोळणी बाहेगाव, ता. बदनापूर) असे जखमीचे नाव असून, (एमएच २०, सीझेड ८३१६) या मोटारसायकलीने बायपासवरून जात असताना (एमएच २०, डीई ५३५०) या छोट्या टेम्पोची जोराची धडक दुचाकीला लागली. अपघातग्रस्त व्यक्ती रोडवर पडून दुचाकीसह दोनशे फूट दुभाजक ओलांडून रोडपलीकडे पडला होता. शिरसाट याच्या डाव्या पायाचे पंजाजवळ दोन तुकडेच झाल्याचे दिसत होते, तर हाताला तसेच कपाळावरही जखम झाल्याचे दिसत होते.ग्रीव्हज कॉटन येथील इंजिनिअर सचिन कटारे व इंद्रजित खोबरे, चालक बाळू अपघात झाला त्यावेळी याच रस्त्यावरून एका कर्मचाºयाला प्रकृती खराब झाल्याने घरी सोडण्यासाठी जात होते. त्यांनी माणुसकी दाखवून जखमी व्यक्तीला रुग्णवाहिकेतून घाटीत दाखल केले.रस्त्याच्या दुभाजकावर डोके आदळले, तरी दुचाकीचालकाच्या डोक्यावर हेल्मेट असल्याने फारशी इजा झाली नाही; परंतु हातायापाला जबर मार लागला.