शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:57 IST

भरधाव कारने दुचाकीस्वारांना धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात शुक्रवारी रात्री मृत्यू झाला आहे़ या अपघातात दुचाकीस्वार दुसरा तरुण जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भरधाव कारने दुचाकीस्वारांना धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात शुक्रवारी रात्री मृत्यू झाला आहे़ या अपघातात दुचाकीस्वार दुसरा तरुण जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. हा अपघात शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास औरंगाबाद- नाशिक मार्गावरील पडेगाव येथील एका पेट्रोलपंपाजवळ घडला. यावेळी चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार रस्त्याशेजारील झोपडीत घुसली. सुदैवाने झोपडीतील सात जण बाजूला पळाल्याने त्यांना दुखापत झाली नाही.शेख इम्रान शेख अली (३२, रा़ इंदिरानगर, बायजीपुरा) असे मयताचे नाव आहे. शेख खाजा शेख नबाब (२२) हा या अपघातात जखमी झाला. पोलिसांनी सांगितले की, इम्रान आणि खाजा हे आज सकाळी मोटारसायकलने ( क्र.एमएच २०- बीके ७३७२) खुलताबाद येथील उरुसाच्या कार्यक्रमासाठी जात असताना समोरून आलेल्या कारने (क्र . एमएच-१७ एझेड ०७०८) त्यांना जोराची धडक दिली़ या अपघातात दोघेही रस्त्यावर पडले आणि गंभीर जखमी झाले. अपघातानंतर चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने तो कारसह रस्त्याशेजारील झोपडीत घुसला आणि थांबला. या घटनेत कारचालकासह इम्रान आणि खाजा हे गंभीर जखमी झाले. छावणी पोलिसांनी सर्व जखमींना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना इम्रानचा रात्री ७ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला़ अपघातात दुचाकी पूर्णत: चक्काचूर झाली आहे़झोपडीतील सहा जण बजावलेअपघातात कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपडीत घुसली़ त्यावेळी झोपडीत एक महिला स्वयंपाक करीत होती तर तिची मुले तेथे बसली होती. अपघाताच्या आवाजाने ते सर्व जण बाहेर आले आणि कार त्यांच्या दिशेने येत असल्याचे पाहून दूर पळाले. त्यामुळे सुदैवाने झोपडीतील कोणालाही दुखापत झाली नाही. या घटनेची नोंद छावणी पोलीस ठाण्यात करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांनी दिली.ं