शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘एकता दौड’ला जालनेकरांचा मोठा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 23:24 IST

सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरात मंगळवारी एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते.

जालना : सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरात मंगळवारी एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील मस्तगड येथे सरदार वल्लभभाई पटेल तसेच स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले व एकता दौडला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला.याप्रसंगी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, माजी आ. अरविंद चव्हाण, रामेश्वर भांदरगे, भास्कर दानवे, जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, अपर जिल्हाधिकारी पी.बी. खपले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, तहसीलदार बिपीन पाटील, उप विभागीय अधिकारी केशव नेटके, आदींनी वल्लभभाई पटेल तसेच स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले व एकता दौडमध्ये सहभाग नोंदवला. पालकमंत्र्यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.मस्तगड येथून सुरु झालेली ही रॅली मम्मादेवी, सुभाषचंद्र बोस पुतळा, पाणीवेस, काद्राबादमार्गे शिवाजी पुतळा येथे विसर्जित करण्यात आली. या दौडमध्ये जि. प. प्रशाला (मुलांची), इंडस बालकामगार प्रकल्पचे विद्यार्थी, आॅक्सफर्ड इंग्लिश स्कूल, पोतदार इंग्लिश स्कूल, राष्ट्रीय हिंदी विद्यालय, स्काऊट गाईड, गोल्डन ज्युबिली स्कूल, नर्सिंगचे विद्यार्थी, शाळेचे विद्यार्थी, डॉक्टर्स, पोलीस कर्मचारी, एसआरपीएफचे जवान यांच्यासह रोटरी क्लब, लायन्स क्लबचे पदाधिकारी, सर्व शासकीय अधिकारी, कर्मचा-यांसह नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. नर्सिंग तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांनी रन फॉर युनिटी, अनेकता मे एकता, यही भारत की विशेषता, भारत देश है मेरी शान इसकी भाषा है महान, असा मजकूर असलेले फलक हाती घेऊन एकतेसंदर्भात जनजागृती केली.