शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंच्या हस्ते दोन हजार कोटींच्या विकासकामांचे आज भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:24 IST

औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारने शहरात पहिल्यांदाच विकासकामांचा धूमधडाका सुरू केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सुमारे दोन ...

औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारने शहरात पहिल्यांदाच विकासकामांचा धूमधडाका सुरू केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सुमारे दोन हजार कोटींच्या कामांचे शनिवारी गरवारे क्रीडा संकुलावर दूरसंवाद पद्धतीने दुपारी १ वाजता भूमिपूजन केले जाणार आहे. १६८० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना, १४७ कोटींचे सफारी पार्क, १५३ कोटींचे रस्ते व २३ कोटी रुपये खर्चाच्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा यात समावेश आहे.

शहराचा पाणीप्रश्‍न १५ वर्षांपासून तापत होता. समांतर पाणीपुरवठा योजनेचा प्रयोग यशस्वी झाला. गतवर्षी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १६८० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली होती. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत हे काम केले जात असून, पहिल्या टप्प्यातील कामाची १३०८ कोटी रुपयांची निविदा अंतिम करण्यात आली आहे. ही योजना पूर्णत्वास आल्यास शहराचा २०५२ पर्यंचा पाणीप्रश्‍न मिटणार आहे. शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते योजनेच्या कामाचे भूमिपूजन केले जाणार आहे. यावेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री सुभाष देसाई, मंत्री गुलाब पाटील, संदीपान भूमरे, अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याचवेळी इतर तीन कामांचे भूमिपूजनही होईल.

स्मारक, सफारी पार्क, रस्ते

सिडकोत सात हेक्टर जागेवर स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक व स्मृती उद्यान उभारले जाणार आहे. माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी स्मारकासाठी जागेची निवड केली होती. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आपल्या संकल्पनेनुसार डिझाईन तयार करून घेतले आहे. या कामासाठी सुमारे २३ कोटी रुपये खर्च होणार आहेत. तसेच मिटमिटा येथे स्‍मार्ट सिटी योजनेतून सफारी पार्क विकसित केले जाणार आहे. त्यासाठी १४७ कोटी रुपये खर्च केला जाणार असून शासनाने ८४ हेक्टर जमीन दिली आहे. सफारी पार्कच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या समारंभात भूमिपूजन होईल. शहरात शासन निधीतून १५२ कोटींचे २३ रस्ते तयार केले जात आहेत. ही कामे सुरू झाली असली तरी या समारंभात आभासी पद्धतीने भूमिपूजन होणार आहे.

--------------