शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रॉनिक क्लस्टरचे सोमवारी भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:52 IST

केंद्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने शेंद्र्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नं. पी-३० मधील २ एकर जागेत इलेक्ट्रॉनिक क्लस्टर उभारण्यात येणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : केंद्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने शेंद्र्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नं. पी-३० मधील २ एकर जागेत इलेक्ट्रॉनिक क्लस्टर उभारण्यात येणार आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन १६ आॅक्टोबर रोजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खा. रावसाहेब दानवे, खा. चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत होत आहे, अशी माहिती देवगिरी इलेक्ट्रॉनिक क्लस्टर प्रा. लि. चे संचालक सुरेश तोडकर, सीएमआयचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आशिष गर्दे, गौतम नंदावत आदींची उपस्थिती होती.पहिल्या टप्प्यात २८ कोटी ५८ लाख रुपयांचे, तर दुस-या टप्प्यात २० कोटींचे अनुदान देण्याचे निश्चित केले आहे. ४८ कोटी रुपयांच्या या क्लस्टरमुळे विभागात इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील उद्योगांना चालना मिळणार आहे. भूमिपूजनाचा नारळ फुटल्यानंतर २ वर्षांत काम पूर्ण होईल, असा दावा यावेळी करण्यात आला.मराठवाडा आॅटो क्लस्टरच्या निर्मितीनंतर देशातील पहिले इलेक्ट्रॉनिक क्लस्टर औरंगाबादेत होत आहे. पुणे आणि म्हैसूर येथेदेखील अशा प्रकारचे क्लस्टर प्रस्तावित असून, त्यांच्यापूर्वी औरंगाबादने भूमिपूजन होत आहे.देवगिरी इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर प्रा.लि. कॉमन फॅसिलिटी सेंटर या स्पेशल पर्पज व्हेकलअंतर्गत या क्लस्टरचे काम पूर्ण केले जाणार आहे. या क्लस्टरच्या डीपीआरला मान्यता मिळाली आहे. सीएमआयएच्या या प्रकल्पासाठी देवगिरी इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर प्रा.लि. ही एसपीव्ही (स्पेशल पर्पज व्हेकल) स्थापन करण्यात आलेली आहे. ५० कोटी रुपये गुंतवणुकीतून हे क्लस्टर उभे राहील. पहिल्या टप्प्यात २८ कोटी ५८ लाख रुपये अनुदान केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने मंजूर केले आहे. ७५ टक्के अनुदान केंद्र शासन देणार आहे. १० टक्के अनुदान महाराष्ट्र शासन आणि १५ टक्के अनुदानाचा वाटा देवगिरी इलेक्ट्रॉनिक्स प्रा.लि. ही संस्था उचलणार आहे, असे सांगण्यात आले.