परतूर : सैलानी बाबाचा दरबार भरवत गावातील महिला, मुली यांच्या अंगात देवाचा संचार होतो, असे सांगून गावात भांडणे लावणाऱ्या भोंदू बाबाचा ‘अंनिस’ने शनिवारी पर्दाफाश क ेला. तालुक्यातील वाघाडी वाडी येथील भोंदू महाराज राजू उत्तम राठोड हा गावातील महिला व मुलींच्या अंगात देव येतो. तुमच्या घरावर कोणी भानामती करणी केली आहे, असे सांगून कोणाचेही नाव घेवून गावात भांडणे लावण्याचे काम करत होता. गावातील लोकांच्या घरी जाऊन बीबे, गोटे जमिनीतून काढून आता तुमची करणी काढून टाकली, असे सांगनू अघोरी उपचार करणे, लोकात घबराट निर्माण करणे या प्रकाराची एका पीडितेने ‘अंनिस’कडे तक्रार केली होती.या तक्रारीच्या आधारे पोलिस निरीक्षक महादेव राऊत यांच्याकडे हे प्रकरण लावून धरले. यावर भोंदूबाबाला ठाण्यात बोलावून घेतले. सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या भोंदू बाबाने पोलिसी खाक्या दाखवताच आपल्या कृत्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलिस निरीक्षक महादेव राऊत, जमादार सुरडकर, शंकर च्वहाण, प्रल्हाद गुंजकर, लालझरे, कांबळे, सह अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे रमाकांत बरीदे, कल्याण बागल, मधूकर गायकवाड, एकनाथ कदम, राजेश कानपडू, लक्ष्मीकांत माने, गणेश राठोड, शंकर थोटे, दिलीप मगर यांच्यासह गावकऱ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)
भोंदू बाबाचा पर्दाफाश
By admin | Updated: July 24, 2016 00:43 IST