शिरीष शिंदे , बीडबँकेमार्फत कर्ज पाहिजे असल्यास कागदपत्रांची पूर्तता करुनही कर्ज मिळेलच याची शाश्वती नाही़ याला पर्याय म्हणून ग्रामीण भागासह शहरी भागात अनेक वर्षांपासून ‘भिशी’चा अवैध धंदा जोमात सुरु आहे़ ही योजना अवैध असली तरी मोठ्या प्रमाणात तात्काळ पैसे मिळत असल्याने ‘भिशी’ ला जणू समाजाश्रयच लाभला आहे़ अनेक वर्षांपासून चालविल्या जाणाऱ्या भिषीचे विविध प्रकार असले तरी दोन प्रकारच्याच भिशी प्रसिद्ध आहेत़ कमिशन बेसीस अर्थात पुकार भिषी व बिन व्याजी भिशी़ या दोन पैकी कमिशन बेसीस भिशी अत्यंत जोखिमपूर्ण व लाभदायकही ठरते़ त्यामुळे अनेकजण रिस्क स्वीकारून या भिशीत उतरतात़ दरम्यान, शहराच्या बाजारपेठेतील जवळपास प्रत्येक व्यापारी पुकार भिशीच्या विळख्यात अडकलेला आहे़ या भिशीमध्ये सर्व प्रकार विश्वासावर चालतो. परंतु काही अपप्रवृत्तीमुळे भिशी चालविणाऱ्या मध्यंस्थावर कंगाल होण्याची वेळ आली आहे़ पुकार भिशीमध्ये वीस जणांचा गट असतो़ यात आर्थिक समृद्धीवर वीस हजार ते एक लाख रुपयापर्यंत भिशी लावली जाते़ दर महिन्याला मध्यस्थीच्या मार्फत या भिषीचा बोली/ लिलाव केला जातो़ यात पाच लाख पर्यंतची भिशी घेणारा अडीच लाखापर्यंत बोली करुन घेतो़ उरलेली रक्कम भिशी चालक किंवा मध्यस्थी हा कमिशन म्हणून ठेऊन घेतो व ती रक्कम सर्व सभासदांना समप्रमाणात वाटून घेता़ पुन्हा त्या व्यक्तीस भिशी घेता येत नाही़ मात्र त्याला दर महिन्याला भिशीचा हप्ता भरावा लागतो़ शहरातील व्यापाऱ्यांमधे पाच लाखापर्यंतीची भिषी चालवली जाते़ जेवढी मोठी भिषी तेवढी रक्कम बुडण्याचा धोका असतो असे एक भिशी एजंटने सांगितले़ परतावा चांगला व मध्यस्थी किंवा भिशी चालकाला चांगला फायदा होत असल्याने या अवैध योजनेत अनेकजण उतरत आहेत़ विशेष म्हणजे, एक भिषी चालक किंवा मध्यस्थी हा एका वेळी दहा ते पंधरा पुकार भिशी चालवित असतात़ बहुतांश वेळा भिशी बुडाल्याने अनेकांनी आत्महत्या केलेल्या आहेत तर काही भिषी चालक अर्ध्यातून भिशी बुडवून गेले आहेत. बीड शहरातील पेट्रोलपंपावर एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता़ त्याच्या दोन पुकार भिशी बुडाली असल्याने त्यास लाखो रुपयांचा फटका बसला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे़ काही व्यक्ती पुकार भिशी चालवून मध्येच पळून गेले आहेत़ अनेक वर्षांपासून भिशी योजना अनेक ठिकाणी चालवली जाते़ भिशीच्या वेगवेगळ्या पद्धती असून या योजनेत सहभागी होणाऱ्यांचा हेतू वेगवेगळा असतो़ पहायला गेले तर भिशी चालविण्यास प्रतिबंध केला जातो़ भिशीद्वारे अनेकांनी सर्वसामान्यांना गंडा घातला असल्याने या संदर्भात कायदा करणार असल्याचे माजी गृहमंत्री आऱआऱ पाटील यांनी जाहीर केले होते़ मात्र त्यानंतर लोकसभा निवडणुका जाहीर झाल्याने या कायद्यचा प्रश्न बारगळा़ या संदर्भात प्रशासनाकडे तक्रारी आल्याने या संदर्भात कायदा अधिक कडक करण्याची गरज भासत आहे़
‘भिशी’चा गोरख धंदा
By admin | Updated: November 19, 2014 00:59 IST