शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

भीमसागर उसळला!

By admin | Updated: April 15, 2017 00:33 IST

जालना: शहरासह जिल्ह्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.

जालना: शहरासह जिल्ह्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध समाजसेवी संघटनांनी सामाजिक उपक्रम राबवून महामानवास अभिवादन केले. जयभीमच्या जयघोषाने अवघा आसमंत दुमदुमून गेला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ जयंतीनिमित्त शहरात शुक्रवारी सकाळपासूनच अपूर्व उत्साह दिसून आला. विविध रस्ते, चौक तसेच वसाहतींमध्ये जयंतीचे कार्यक्रम पार पडले. सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, विविध शासकीय तसेच निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बुद्ध विहारमध्येही जयंतीनिमित्त वंदनेसह विविध कार्यक्रम घेण्यात आले. अनेक घरांवर निळेध्वज फडकत होते. सायंकाळनंतर जयंतीचा खरा उत्साह दिसून आला. सजविलेल्या अनेक वाहनांमधून बाबासाहेबांची प्रतिमा शोभून दिसत होती. अनेक संघटना तसेच मंडळांनी सजीव देखावे सादर करून जनजागृती केली. वाहनांवर आकर्षक विद्युत रोषणाई करून बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले होते. नूतन वसाहत, रेल्वेस्थानक, कन्हैयानगर आदी भागांतील मिरवणुका लक्षवेधी होत्या. डीजेवर बाबासाहेबांच्या उद्देशून असलेल्या गीतांवर तरूणांसोबतच आबालवृद्धांनी ठेका धरल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून आले. डीजेसोबतच काही जयंती समितीचे ढोलपथक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. सुभाष चौकात भीम जल्लोष स्वागत मंचने उभारलेले एलईडी स्क्रीन, लाईव्ह गीते आणि आकर्षक असे शार्पी लाईटसमुळे एक वेगळाच माहोल तयार झाला होता. यावेळी आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता पाटील, आयोजक संदीप खरात, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे, बबलू चौधरी, नगरसेविका मीनाक्षी खरात, विजय चौधरी, अरूण मगरे, रितेश चौधरी, जीवन सले, अंकुश पाचफुले आदी उपस्थित होते. दरम्यान मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.