शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
3
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
4
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
5
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
6
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
7
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
8
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
9
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
10
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
11
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
12
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
13
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
14
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
15
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
16
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
17
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
18
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
19
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
20
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट

भाई केशवराव धोंडगे यांची राजकारणावर चौफेर टोलेबाजी

By admin | Updated: July 16, 2014 00:47 IST

गंगाधर तोगरे, कंधार शेकापने राजकारणातून समाजकारणाला अधिक महत्त्व दिले़ निवडणुका लढविताना कधी पोस्टर लावले नाही, निवडणुकीसाठी कधी डिपॉझीट भरले नाही़ जनतेनी सर्व केले आणि प्रेम, जिव्हाळा भरभरून दिले

गंगाधर तोगरे, कंधारशेकापने राजकारणातून समाजकारणाला अधिक महत्त्व दिले़ निवडणुका लढविताना कधी पोस्टर लावले नाही, निवडणुकीसाठी कधी डिपॉझीट भरले नाही़ जनतेनी सर्व केले आणि प्रेम, जिव्हाळा भरभरून दिले, आणि निवडणुकीत विजयी केले़ यालउट सद्यस्थितीत राजकारणाचे चित्र असल्याची परखड टोलेबाजी माजी खा़व आ़ भाई डॉक़ेशवराव धोंडगे यांनी बहाद्दरपुरा ताक़ंधार येथे वाढदिवसाला जमलेल्या प्रचंड समुदयाप्रसंगी केली़भाई केशवराव धोंडगे यांचा ९२ वा वाढदिवस बहाद्दरपुरा येथे साजरा करण्यात आला़ या कार्यक्रमात गत ५ दशकापेक्षा अधिक काळ राजकारण, समाजकारण, कुटुंब, सत्याग्रह, मोर्चे यात चंद्रप्रभावती धोंडगे यांची पत्नी म्हणून भाई केशवरावाला मोठी साथ मिळाली़ त्यामुळे परिसस्पर्श केशवाचा अर्थात चंद्रप्रभाच्या घरच्या व दिल्या घरच्या आठवणी या चंद्रप्रभावती धोंडगे लिखित आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात आले़ कार्यक्रमास आ़ शंकरअण्णा धोंडगे, माजी आ़ गुरुनाथराव कुरूडे, माजी आ़ रोहिदास चव्हाण, दत्तगीर महाराज, गंगाबाई मोरे, नारायण पा़ चिवडे, प्राचार्य डॉ़ पी़ डी़ जोशी, प्राचार्य डॉ़ अशोक पाटील - गवते, प्राचार्य डॉ़ जी़ आऱ पगडे, प्रा़ डॉ़ एकनाथ पवार, अ‍ॅड़ मुक्तेश्वर धोंडगे, प्रा़ डॉ़ झिनत अली, डॉ़ सुभाष नागपुर्णे, प्रा़ चित्राताई लुंगारे, प्रा़ संध्याताई धोंडगे, गणपत कलमे आदींची उपस्थिती होती़ आ़ शंकरअण्णा धोंडगे यांनी भाई केशवरावांचे व्यक्तीमत्व अजब रसायनांनी भरले आहे़ त्यांचा स्पष्ट वक्तेपणा, परखड भूमिका, अखंडितपणे त्यांनी जोपासलेली उपेक्षित, वंचितांची न्यायाची भूमिका समाजविकासाला सतत पोषक राहत आली़ या भागाची स्वतंत्र ओळख विधानसभा व लोकसभेत निर्माण केली़ केशवरावांनी या भागाचा विकास करण्यासाठी कोठेही कसूर ठेवली नाही़ या वयातही केशवरावांचा सत्याग्रह राज्यातील राजकीय पातळीवर कुतुहलाचा विषय आहे, असे गौरवोद्गार आ़ धोंडगे यांनी काढले़माजी आ़ रोहिदास चव्हाण यांनी भाई केशवरावांच्या आदर्श व्यक्तीमत्वावर मनमोकळे भाष्य केले़ आणि शेतात खत, गावात पत व घरात एकमत हे भाई धोंडगे यांची खास खासियत असल्याचा उल्लेख केला़ हे नाते-संबंध निर्माण झाल्यानंतर मला कळले, असे ते म्हणाले़ यावेळी माजी आ़ गुरुनाथराव कुरुडे यांनीही मनोगत व्यक्त केले़भाई केशवराव धोंडगे यांनी आपल्या मनोगतात आपला राजकीय, सामाजिक जीवनपट उलगडला़ पूर्वीचाच उत्साह, कणखर भूमिका, सडेतोड उत्तरे त्यांनी उपस्थितांसमोर दिली़ माजी आ़ चिखलीकर, आ़ शंकरअण्णा धोंडगे यांना विधानसभेसाठी व लोहा ऩ प़ साठी माजी आ़ रोहिदास चव्हाण यांना पाठिंबा देवून सहकार्य केले़ आता भाई अ‍ॅड़ मुक्तेश्वरसाठी सर्वांनीच साथ द्यावी, असे आवाहन करताच उपस्थित हजारो जणांनी मोठी दाद दिली़ प्रास्ताविक प्राचार्य डॉ़ अशोक गवते - पाटील यांनी केले़ सूत्रसंचालन माधव पेठकर व अ‍ॅड़ मुक्तेश्वर धोंडगे यांनी आभार मानले़ ग्रंथावर प्रा़ डॉ़ दिलीप सावंत, प्रा़ डॉ़ श्रीधर खामकर, प्रा़ डॉ़ अनिल कठारे, प्रा़ डॉ़ झिनत अली, गणपत कलमे यांनी भाष्य केले़ भाई डॉक़ेशवराव धोंडगे यांनी आपल्या खास वक्तृत्व शैलीत प्रखर, परखड राजकीय भूमिका मांडली़ शेकापशी एकनिष्ठ राहिलो, राजकीय तडजोडी कधी केल्या नाहीत़ बोटचेपी भूमिका घेतली नाही़ जनतेनी केलेल्या प्रेमाची मी कधीच प्रतारणा केली नाही़ शिक्षण, शेती, दळणवळण, वीज क्षेत्रात मला त्यामुळे काम करता आले़सिंचन विकासासाठी मला काँग्रेस सरकार व नेत्याविरोधातही संघर्ष करावा लागला़ लोह्यात छत्रपती शिवाजी महाराज व कंधारात राष्ट्रमाता जिजाऊ यांचा पुतळा बंदिस्त आहे़ त्या विरोधात सत्याग्रह केले़ अद्याप न्याय मिळाला नाही़ लोकप्रतिनिधींनी उघड भूमिका घेवून साह्य करण्याची गरज आहे़