शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगनगरीला आध्यात्माचे भरते!

By admin | Updated: July 5, 2017 00:33 IST

वाळूज महानगर : आपले लाडके दैवत विठुमाऊलीचे आषाढी एकादशीनिमित्त दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांंनी मंगळवारी छोट्या पंढरपुरात अलोट गर्दी केली.

शेख मेहमूद । लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : आपले लाडके दैवत विठुमाऊलीचे आषाढी एकादशीनिमित्त दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांंनी मंगळवारी छोट्या पंढरपुरात अलोट गर्दी केली. मुखी विठ्ठलनामाचा जयघोष व टाळ मृदंगाच्या गजरात येणारे लाखो वारकरी मध्यरात्रीपासून दर्शनासाठी रांगा लावून उभे होते. दिंड्या व भाविकांच्या गर्दीमुळे औद्योगिकनगरीला आध्यात्माचे भरते आले. रात्री उशिरापर्यंत दर्शन रांगेची गर्दी ओसरली नव्हती. जिल्हा परिषद अध्यक्षा अ‍ॅड. देवयानी डोणगावकर आणि त्यांचे पती कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या हस्ते सोमवारी मध्यरात्री १२ वाजता विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महाभिषेक करण्यात आला. महाभिषेक झाल्यानंतर युवराज शिंदे व नम्रता शिंदे या दाम्पत्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्यानंतर वारकऱ्यांना दर्शनासाठी मंदिराचे द्वार खुले करण्यात आले. मध्यरात्रीपासून वाळूज औद्योगिकनगरी तसेच जिल्हाभरातील भाविक, दिंड्यांतील वारकऱ्यांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली. पंचक्रोशीतील लहान मोठ्या वसाहती, ग्राम, तांडे, वाड्यांमधून वारकरी पायी दिंड्या काढून कुटुंबासह पंढरपूरनगरीत दाखल झाले होते. शहरातील बाबा पेट्रोलपंपपासून वाळूजपर्यंत चोहीकडे वारकऱ्यांच्या टाळ मृदंगाचा गजर कानी पडत होता. या रस्त्यावर शेकडो लहान मोठ्या दिंड्या विठुमाऊलीच्या भेटीच्या ओढीने झपाझप पावले टाकत निघाल्या होत्या. त्यात तरुण-तरुणी, बालके, महिला आणि वयोवृद्ध आदी सर्वच वयोगटांचा भरणा होता. वारकरी व भाविकांचे लोंढेच्या लोंढे येत असल्याने छोटे पंढरपूर भक्तिसागरात बुडाले होते.भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे, यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी ट्रस्ट व पोलिसांनी विविध उपाययोजना केल्या होत्या. यंदा प्रथमच महिला व पुरुषांची एकच दर्शन रांग ठेवण्यात आली होती. दिंड्यांतील वारकऱ्यांसाठी विशेष व्यवस्था करून त्यांना सरळ दर्शनाचा लाभ देण्यात आला. सकाळपासून वारकऱ्यांनी दर्शनासाठी गर्दी केल्याने तिरंगा चौक व कामगार चौकापासून लांबच लांब रांगा लागल्या. रात्री उशिरापर्यंत जवळपास ७ ते ८ लाख वारकऱ्यांनी दर्शन घेतल्याचा अंदाज ट्रस्टी व पोलिसांनी वर्तविला. मोठा पोलीस बंदोबस्तपोलीस व ट्रस्टीच्या वतीने मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात, ज्ञानोबा मुंडे, डॉ.नागनाथ कोडे, वाहतूक शाखेचे निरीक्षक एल. ए. शिनगारे, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे आदी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. यात्रा सुरळीतपणे पार पडावी, यासाठी विठ्ठल-रुक्मिणी ट्रस्टचे अध्यक्ष रत्नाकर पा. शिंदे, ह.भ.प. भिकाजी खोतकर, विठ्ठल वाकळे, राजेंद्र पवार, गणेश नवले, पंढरपूरचे सरपंच गौतम चोपडा, उपसरपंच महेंद्र खोतकर, पं.स. सदस्या शमीमबी चौधरी, हरिभाऊ शेळके, वळदगावचे सरपंच राजेंद्र घोडके यांच्यासह वळदगाव-पंढरपूरच्या ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.रस्त्यारस्त्यांवर खेळ मांडियेला...वारकऱ्यांच्या दिंड्या सोमवारी रात्रीपासून दाखल होत होत्या. त्यामुळे औद्योगिकनगरीतील रस्ते गर्दीने फुलून गेले. हे वारकरी विठुनामाचा जयघोष करीत होते. ठिकठिकाणी अभंग, कीर्तन व भजने गायली जात होती. यंदा २५० दिंड्या सहभागी झाल्याचे ट्रस्टींनी सांगितले.