औरंगाबाद : जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांविरुद्ध ‘आॅन दी स्पॉट’ कारवाई करण्यासाठी जिल्हास्तरीय भरारी पथक स्थापन केले जाणार असून, त्यामध्ये ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, पोलीस, अन्न व औषध निरीक्षक आदींचा समावेश असेल.‘जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा धंदा जोरात’ या आशयाचे ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने बोगस डॉक्टरांविरुद्ध विशेष मोहीम सुरू केली.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत ग्रामीण भागामध्ये तपास मोहीम राबविल्यानंतर जिल्ह्यात प्रथमदर्शनी २६६ बोगस डॉक्टर आढळून आले. त्यांना सभापती विनोद तांबे यांच्या आदेशानंतर कारणेदर्शक नोटिसा बजावण्यात आल्या. तेव्हा १८ जणांनी त्यांचे दवाखाने गुंडाळल्यामुळे त्यांना नोटिसा बजावणे शक्य झाले नाही. उर्वरित १५० डॉक्टरांनी नोटिसांचे खुलासे आरोग्य विभागाला सादर केले असून, जवळपास १०० बोगस डॉक्टरांनी अद्यापही खुलासे सादर केलेले नाहीत. बोगस डॉक्टरांसंबंधी स्थापन करण्यात आलेल्या तालुकास्तरीय समितीमध्ये तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी, आरोग्य विभागाचे पर्यवेक्षक हे प्राप्त खुलाशानुसार संबंधितांच्या कागदपत्रांची छाननी करतील. ४यामध्ये प्रामुख्याने बॉम्बे नर्सिंग अॅक्टनुसार ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे नोंदणी करणे गरजेचे आहे. अशा प्रकारची नोंदणी न करणारे डॉक्टरही बोगस डॉक्टर म्हणून ग्राह्य धरले जाणार आहेत. ४शिवाय अनेक वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर हे रुग्णांना औषधींची विक्रीदेखील करत असल्याचे समितीच्या निदर्शनास आले आहे. अशा डॉक्टरांची चौकशी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या निरीक्षकाची भरारी पथकात नियुक्ती करण्यात आलेली आहे.
भरारी पथकाची ‘मुन्नाभार्इं’वर नजर
By admin | Updated: September 15, 2015 00:32 IST