पाटोदा : येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या इमारत व वसतिगृह बांधकामाचे गेल्या पाच वर्षांपासून भिजत घोंगडे आहे. वेळेत बांधकाम न झाल्याने खर्चात वाढ होतच आहे शिवाय नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यातहीे अडथळे निर्माण होत आहेत.पाटोदा शहरात पंधरा वर्षांपूर्वी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय ) सुरू करण्यात आले आहे. यासाठी अद्यापही अद्ययावत इमारत बांधण्यात आली नसल्याने येथे तुटपुंजा जागेत विद्यार्थी ज्ञानार्जन करतात. सध्या हे प्रशिक्षण केंद्र ग्रामपंचायतीच्या सामाजिक सभागृहाच्या इमारतीत सुरू आहे. २००८-०९ मध्ये नवीन इमारत व वसतिगृहाच्या बांधकामास मंजुरी मिळालेली आहे. यासाठी निधीचीही तरतूद केलेली आहे. मात्र गेल्या पाच वर्षांपासून हे काम कासवगतीने सुरू असून खर्चात वाढ तर झालीच; शिवाय नवीन ट्रेड सुरू करण्यातही अडथळे निर्माण होत आहेत. इमारत नसल्याने कॉम्प्युटर आॅपरेटर, डिझेल मेकॅनिक व इतर महत्वाच्या शाखा सुरू झालेल्या नाहीत.नवीन इमारतीबाबत उपअभियंता शेख जिलानी म्हणाले, लवकरच इमारतीचे बांधकाम पूर्ण करू. (वार्ताहर)
औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचे भिजत घोंगडे
By admin | Updated: July 24, 2014 00:07 IST