शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

छोट्या पंढरीत भक्तिसागर

By admin | Updated: July 10, 2014 01:16 IST

वाळूज महानगर : टाळ -मृदंगाचा गजर, विविध भजने म्हणत विठ्ठलाच्या दर्शनासाठी आज जवळपास ५ लाख भाविकांचा जनसागर छोट्या पंढरपुरात जमला होता.

वाळूज महानगर : टाळ -मृदंगाचा गजर, विविध भजने म्हणत विठ्ठलाच्या दर्शनासाठी आज जवळपास ५ लाख भाविकांचा जनसागर छोट्या पंढरपुरात जमला होता. पावली खेळत तसेच विठ्ठलनामाचा जयघोष करीत भाविक व वारकऱ्यांच्या गर्दीने रस्ते फुलले होते.येथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात मंगळवारच्या मध्यरात्री १२ वाजून १ मिनिटांनी औरंगाबाद पंचायत समितीचे उपसभापती सर्जेराव पा.चव्हाण व त्यांच्या पत्नी रंजना यांच्या हस्ते विठ्ठलाचा महाअभिषेक व पूजा करण्यात आली. त्यानंतर मनपा स्थायी समितीचे सभापती विजय वाकचौरे यांनी सपत्नीकआरती केली. रात्री १ वाजता मंदिराचे दार भाविकांसाठी उघडण्यात आले. औरंगाबादसह परिसरातून वारकरी व भाविकांचे जथे, दिंड्या भजन, कीर्तन, रिंगण खेळत येथे येत होते. महिला व पुरुषांना सहजपणे दर्शन घेता यावे यासाठी लोखंडी व लाकडी बॅरिकेटस् उभारण्यात आले होते. पायी येणाऱ्या दिंड्यातील वारकऱ्यांच्या दर्शनाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी तिरंगा चौकापासून मंदिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांच्या रांगा होत्या. मंदिर परिसरात महिला भाविकांनी फुगड्यांचा आनंद लुटला. रात्री उशिरापर्यंत मंदिरात जिल्ह्यातील भाविकांनी व जवळपास १२५ दिंड्यांनी गर्दी केली होती. यात्रेसाठी ट्रस्टचे अध्यक्ष रत्नाकर पा.शिंदे, पुजारी ह.भ.प. पांडुरंग महाराज कुलकर्णी, ह.भ.प. श्रीराम महाराज कुलकर्णी, तान्हाजी महाराज शेरकर, भिकाजी खोतकर, विठ्ठलराव वाकळे, बाबूराव झळके, मोहन चव्हाण, बाळासाहेब राऊत, विष्णू झळके, हरिभाऊ शेळके, लता कानडे, प्रकाश झळके, देवराव मातकर, रामनाथ पवार, राधाकिसन नवले, पंचायत समिती सदस्य गणेश नवले, सरपंच लक्ष्मीबाई कोरडकर आदींनी परिश्रम घेतले.मुलगी जखमीयात्रेत खोजेवाडी येथील दिंडीत आलेल्या महिलेचे मंगळसूत्र कापण्यासाठी चोरट्याने ब्लेड वापरले. त्यात तिची मुलगी पूजा नंदू शिंदे (८) जखमी झाली. तिच्या पालकांनी तिला रुग्णालयात दाखल केले. गर्दीत यू.ए. पवार या महिलेच्या बॅगमधील पर्स चोरीस गेली. त्यात रोख १ हजार रुपये, आधार कार्ड, ओळखपत्र होते. सुरक्षितता म्हणून १४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, ४ कॅमेरे मंदिरात तर १० कॅमेरे मंदिर परिसरात आहेत. तरीही या अप्रिय घटना घडल्या.