हिंगोली : शहराजवळील गंगानगर भागात राणीसती मंदिरामध्ये श्री कृष्ण जन्मोत्सवानिमित्त १७ आॅगस्टपासून विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत. त्यात संगीतमय भजनसंध्या आयोजित करण्यात आली होती. सोमवारी सकाळी गायक उज्वल खाकोलिया यांचा भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. डॉ. बनवरीलाल बगडिया यांच्यासह महोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.बुधवारी रामदेवबाबा संगितमय जम्मा जागरन, शुक्रवारी भजनसम्राट अंबरीश यांचा संगीतमय भजनसंध्याचा कार्यक्रम होणार आहे. शनिवारी सचिन अग्रवाल व हरिओम सत्संग मंडळाचा संगितमय सुंदरकांड कार्यक्रम घेण्यात येणार आहे. २५ आॅगस्ट रोजी पहाटे पाच वाजल्यापासून पूजा, हवन, महाआरती, प्रसाद आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री राणीसती सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
राणीसती मंदिरात भजनसंध्या कार्यक्रम
By admin | Updated: August 23, 2014 00:46 IST