शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
3
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
4
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
5
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
6
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
7
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
8
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
9
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
10
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
11
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
12
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
13
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
14
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
15
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
16
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
17
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
18
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
19
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
20
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत

भाग्यश्री-विशालचा जुळला पुन्हा संसार..!

By admin | Updated: December 9, 2015 00:41 IST

राजकुमार जोंधळे , लातूर किरकोळ कारणांवरुन भाग्यश्री व विशालचा संसार विस्कटला होता़ भांडण टोकाला गेले़ ही विस्कटलेली घडी निलंगा पोलिसांच्या मदतीने बसली असून, आता या दोघांचा संसार रुळावर आला आहे़

राजकुमार जोंधळे , लातूरकिरकोळ कारणांवरुन भाग्यश्री व विशालचा संसार विस्कटला होता़ भांडण टोकाला गेले़ ही विस्कटलेली घडी निलंगा पोलिसांच्या मदतीने बसली असून, आता या दोघांचा संसार रुळावर आला आहे़ निलंगा शहरातील साठे नगरातील भाग्यश्री सुनील थोरात यांचा विवाह मुंबई येथील विशाल बाबुराव कांबळे यांच्याशी रितीरिवाजाप्रमाणे २०१३ मध्ये झाला. लग्नानंतर भाग्यश्री आणि विशालचा संसार सुरळीत सुरु होता. काही शुल्लक कारणामुळे त्यांच्यात गैरसमज वाढत गेले. याच गैरसमजाचा कुटुंबातील इतर मंडळींनी फायदा घेत प्रकरण प्रतिष्ठेचे बनविले. त्यातून त्यांनी कांही पैशामध्ये तडजोड करत घटस्फोट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र भाग्यश्रीला विशालसोबतच संसार करायचा होता. घरातील कांही मंडळींमुळे हे शक्य होत नव्हते. या दोन कुटुंबातील वाद खूपच विकोपाला गेला. शेवटी भाग्यश्री ही आपल्या आई-वडिलांकडे निलंग्यातच राहू लागली. यादरम्यान तिने आपल्याला सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्याची तक्रार निलंगा पोलिस ठाण्यात सप्टेंबरमध्ये दाखल केली. यानंतर लातूरच्या महिला तक्रार निवारण केंद्रात विशाल आणि भाग्यश्रीचे समुपदेशन झाले. मात्र विशाल आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा घटस्फोटासाठी आग्रह होता. दरम्यान निलंगा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक प्रियंका अगाव यांनी हे प्रकरण आपल्या हाती घेतले. त्यांनी मुंबईतील विशाल कांबळे यांचे घर गाठले. त्यांनी या कुटुंबाला निलंग्यात बोलावून घेत सोमवारी दोन्ही कुटुंबाचे समुपदेशन केले. केवळ शुल्लक कारणांमुळे संसार कसा मोडतो हेच पोलिसांनी त्यांच्या लक्षात आणून दिले. शेवटी भाग्यश्री आणि विशाल यांच्यात निलंगा पोलिसांच्या मध्यस्थीमुळे तडजोड झाली आणि तुटणारा संसार पुन्हा जुळला. पोलिसांच्या मध्यस्थीने पुन्हा नव्याने संसार थाटण्याचे वचन या दोघांनी एकमेकांना दिले़