शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अंबड-जालना-वडीगोद्री चौपदरीकरण मार्गाचे भूमिपूजन

By admin | Updated: September 8, 2014 00:53 IST

अंबड : अंबड-वडीगोद्री-जालना चौपदरीकरण मार्गाचे भूमिपूजन रविवारी पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते अंबड येथे झाले. अंबड शहरासाठी नवीन बायपास रस्ता, जिल्ह्यात राजूर गणपती

अंबड : अंबड-वडीगोद्री-जालना चौपदरीकरण मार्गाचे भूमिपूजन रविवारी पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते अंबड येथे झाले. अंबड शहरासाठी नवीन बायपास रस्ता, जिल्ह्यात राजूर गणपती व मत्स्योदरी देवी मंदिरासाठी लिफ्टची सुविधा तसेच अंबड शहरासाठी जालना-जायकवाडी योजनेतून जोडणी अशा विविध कामांची घोषणा पालकमंत्री टोपे यांनी यावेळी केली. व्यासपीठावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, आ. संतोष सांबरे, नगराध्यक्षा मंगल कटारे, जि.प. गटनेते सतीश टोपे, उपनगराध्यक्ष संदीप आंधळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना पालकमंत्री टोपे म्हणाले की, ३३८ कोटी रुपये खर्चाच्या वडीगोद्री-जालना मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम येत्या एक वर्षात पूर्ण करण्यात येईल. या मार्गाच्या चौपदरीकरणामुळे अंबड व घनसावंगी या दोन्ही तालुक्यांच्या विकासास मोठी चालना मिळणार आहे. व्यापार, शेती व शैक्षणिक क्षेत्राच्या विकासास या मार्गाच्या चौपदरीकरणाने गती येणार आहे. याबरोबरच अंबड शहरातील व्यापाऱ्यांनी मागणी केल्याप्रमाणे जड वाहतुकीसाठी शहराबाहेरुन बायपास काढण्यासाठीची प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येईल. अंबड शहराचा पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी जालन्याचे आ. कैलास गोरटयांल व नगर परिषदेशी चर्चा सुरु करुन पाणी दराबाबत योग्य समाधान काढण्यात येईल. आगामी दोन ते तीन दिवसातच शहरास जायकवाडी-जालना योजनेतून जोडणी करण्यात येणार आहे. जिल्हयातील राजुर येथील गणपती व मत्स्योदरी देवी मंदिरात वृद्ध, आजारी भक्तांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी लिफ्ट सुरु करण्यात येणार आहे. मत्स्योदरी देवी मंदीरातील लिफ्टसाठी जिल्हा नियोजनातुन ६० लाख रुपये मंजुर करण्यात आले लिफ्टसाठीची सर्व प्रक्रिया पुर्ण करण्यात आली असून लवकरच लिफ्टच्या कामास सुरुवात होणार आहे. जंगी तलाव सुशोभीकरणासाठी ६ कोटी रुपयांच्या योजनेस पर्यावरण खात्याने मंजुरी दिली असुन लवकरच सरोवर विकास प्रकल्प योजनेअंतर्गत जंगी तलावाचे सुशोभिकरण करण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले की, जालना-वडीगोद्री मार्गाचे चौपदरीकरण होणार असल्याने या मार्गावरील अंबड शहरातील दुकानांचे बांधकाम पाडण्याबाबत शहरातील व्यापाऱ्यांनी आपल्याकडे चिंता व्यक्त केली. याविषयी आपण कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा केली असता चौपदरीकरणासाठी शहरात मुबलक जागा उपलब्ध असल्याने कोणतेही दुकान पाडण्याची आवश्यकता नसल्याचे आपल्याला कार्यकारी अभियंता यांनी स्पष्ट केले आहे.