कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिशोर येथील पोलीस ठाण्यात व्यापाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. याप्रसंगी त्यांनी हे मत व्यक्त केले. दिल्ली, गुजरात, गोवा, राजस्थान या राज्यांत कोरोना विषाणू संसर्ग वाढला आहे. महाराष्ट्रात संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासनाने आतापासून उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. पिशोर गावातील सर्व व्यापाऱ्यांनी एकाच वेळी दुकानात पाचपेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश देऊ नये, दोन ग्राहकांदरम्यान सुरक्षित अंतर, विनामास्क ग्राहकास दुकानात प्रवेश न देणे आदी सूचना बैठकीत देण्यात आल्या. या बैठकीला गावातील व्यापारी, पोलीस नाईक परमेश्वर दराडे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
कोरोना संकटाला रोखण्यासाठी सतर्क राहा : व्यापाऱ्यांना सावधनतेचा इशारा
By | Updated: November 28, 2020 04:08 IST