शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भाग्यश्री योजनेला लाभार्थीच मिळेनात

By admin | Updated: November 2, 2016 01:04 IST

बीड : स्त्री भ्रूण हत्येमुळे जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाली होती.

बीड : स्त्री भ्रूण हत्येमुळे जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाली होती. बीड पाठोपाठ इतर ठिकाणीही चार वर्षांपूर्वी स्त्री भ्रूण हत्येचे गैरप्रकार समोर आले होते. त्यानंतर स्त्री जन्माचा टक्का वाढविण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना सुरू झाल्या. यापैकीच ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही महत्वाची योजना. मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे वर्षभरात केवळ १६ जणांपर्यंत या योजनेचा लाभ पोहचला आहे.१ एप्रिल २०१६ पासून ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही अनोखी योजना संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली. या योजनेंतर्गत एकुलती एक मुलगी असलेल्या व मातेने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असल्यास तिचा जन्म दिन साजरा करण्यासाठी ५ हजार रुपये व मुलींच्या नावे २१ हजार २०० रुपयांचा विमा काढला जातो. तसेच एक मुलगी आहे आणि मातेने दुसऱ्या मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असल्यास दुसऱ्या मुलीचा जन्म दिन साजरा करण्यासाठी अडीच हजार रुपये व दोन्ही मुलींच्या नावे २१ हजार २०० रुपयांचा विमा काढण्यात येतो. पहिल्या वर्षांपासून १८ वर्षांपर्यंत दर्जेदार पोषण आहार व इतर खर्चांसाठी या योजनेंतर्गत लाभ देण्याची तरतूद आहे. कन्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण तरतुदी असलेली ही योजना आतापर्यंत केवळ १६ जणांपर्यंत पोहचली. आष्टी, बीड, केज येथे प्रत्येकी १, परळीत २, अंबाजोगाईत ६ व वडवणीत ५ जणांनी लाभ घेतला. गेवराई, धारुर, शिरुर, पाटोदा, माजलगाव या तालुक्यांमध्ये अद्याप एकही लाभार्थी या योजनेत सहभागी झाला नाही.(प्रतिनिधी)