नियुक्तीस बंदी घातलेला २ फेब्रुवारी २०१२ चा शासन निर्णय विशेष धाेरणांतर्गत केलेल्या अनुकंपा तत्त्वावरील नाेकरीस लागू हाेत नसल्याचा याचिकाकर्तीच्या वतीने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरीत खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.
भारती भाऊसाहेब ठाकरे यांनी ॲड. विलास पानपट्टे यांच्यामार्फत याचिका दाखल केली हाेती. याचिकेत म्हटल्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील खाेंडामळी येथील नूतन माध्यमिक विद्यालयात भाऊसाहेब ठाकरे शिपाई पदावर कार्यरत असताना २४ ऑक्टाेबर २०१२ राेजी त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांची १२ वर्षांची सेवा झाली हाेती. त्यांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर नाेकरी मिळावी व त्यासाठी मान्यता देण्यासाठी भारती ठाकरे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला. मात्र, शिक्षणाधिकाऱ्यांनी नियुक्तीस बंदी असल्याचे व संच मान्यतेमध्ये पदे मंजूर नसल्याचे कारण दाखवून वैयक्तिक मान्यता देन्यास नकार दिला होता.
याचिकाकर्तीची नवीन नियुक्ती नसून आधीच मान्यता मिळालेल्या मयत पतीच्या जागेवर विशेष धाेरणांतर्गत अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती केली जात आहे, असा युक्तिवाद ॲड. विलास पानपट्टे यांनी केला. अनुकंपा तत्त्वावरील अशाच एका याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा आधार त्यांनी त्यांच्या युक्तिवादाच्या पुष्ट्यर्थ सादर केला. सुनावणीअंती खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.