शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धेची सुरुवात, अन् शेवटही श्रमदानानेच !

By admin | Updated: May 22, 2017 23:33 IST

धारूर : पाणी फांऊडेशनच्या वतीने सुरू असलेल्या वॉटर कप स्पर्धामध्ये अखेरच्या टप्यात जायभायवाडी येथे श्रमदानाच्या कामाला गती आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कधारूर : पाणी फांऊडेशनच्या वतीने सुरू असलेल्या वॉटर कप स्पर्धामध्ये अखेरच्या टप्यात जायभायवाडी येथे श्रमदानाच्या कामाला गती आली आहे. मागील पंचेचाळीस दिवसांपासून पुरूषाबरोबर महिला श्रमदान करीत आहेत. स्पर्धेत यश मिळविण्यासाठी ग्रामस्थांनी शेतीची कामे बाजूला ठेवून कुटूंबातील सर्वजण श्रमदान करीत आहेत.तालुक्यात वॉटर कप स्पर्धेमध्ये जायभायवाडी, कोळपिंपरी, आम्ला, व्हरकटवाडी, आवरगाव, कारी आदी गावात कामे सुरू आहेत. ग्रामस्थांकडून सर्वच गावात श्रमदानाचे काम करण्यात येत आहे .पिंपरवाडा गावांतर्गत जायभायवाडी मौजा हे बालाघाटाच्या डोंगरशीत वसलेले गाव आहे. लोकसंख्या पाचशेच्या जवळपास असून उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत होते. पाण्याचे महत्त्व ओळखून ग्रामस्थांनी स्पर्धेत सहभाग घेतला. ८ एप्रिलपासून येथे श्रमदानाची कामे करण्यात येत आहेत. या कामात २०० महिला परिश्रम घेत आहेत. सासू व सून सोबतच सकाळी श्रमदानास निघातात. मुलेही आई वडिलांबरोबर श्रमदान करीत आहेत. दिवस उजाडताच गावकरी घरची कामे उरकून श्रमदानाला निघतात. हनुमान मंदीराजळ महिला - पुरूष एकत्रित येऊन कोणत्या भागात श्रमदान करावयाचे ते निश्चित केले जाते. त्या दिशेने ग्रामस्थ निघतात. २२ मे पर्यंत श्रमदानाचे काम करण्यात येणार आहे. ४५ दिवसांपासून श्रमदानाचे काम सुरू आहे. ग्रामस्थांनी मशागत बाजूला ठेवून श्रमदानात सातत्य ठेवले आहे.अखेरच्या टप्यात रविवारी सकाळी डॉ. अविनाश पौळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, पाणी फांऊडेशनचे मराठवाडा समन्वयक संतोष शिनगारे, माजी उपनगराध्यक्ष माधव निर्मळ यांनी व त्यांच्या सहकार्यानी श्रमदान केले. खोल चर व माती नाला बांधाच्या कामासाठी यंत्राच्या सहाय्याने कामे सुरू आहेत. डिझेल, पैसा अपुरा पडू नये म्हणून अनेकांनी मदत केली आहे.