लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरात विविध भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. अतिक्रमणामुळे नाल्या जागोजागी तुंबलेल्या आहेत. याची दखल घेत नगर पालिकेचे उपाध्यक्ष हेमंत क्षीरसागर व काकू नाना विकास आघाडीचे प्रमुख तथा जि. प. सदस्य संदीप क्षीरसागर यांनी पुढाकार घेत शहरातील सहयोग नगर भागातील अतिक्रमण शनिवारी हटविले.पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील अतिक्रमण काढून गटारी स्वच्छ करण्यासाठी नगर पालिका सरसावली आहे. याचाच भाग म्हणून जि. प. सदस्य संदीप क्षीरसागर, माजी आ. सय्यद सलीम व उपाध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी पुढाकार घेत यंत्राद्वारे नाल्यांवरील अतिक्रमण काढण्यासोबतच स्वच्छता मोहीम सुरू केली. मोहिमेसोबतच पावसाळी पूर्व कामांनाही सुरूवात झाली.शनिवारी सहयोगनगर भागात ठिकठिकाणी असलेले अतिक्रमण काढण्यात आले. विशेष म्हणजे ज्या दुकानदारांनी नाल्यांवर अतिक्रमण केलेले आहे त्यांनीच पुढे येऊन सहकार्य केले. या उपक्रमामुळे सामान्यांनी समाधान व्यक्त केले.
नाल्यांवरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात
By admin | Updated: May 7, 2017 00:02 IST