शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

बीड पालिकेत ‘मन का राज’!

By admin | Updated: June 20, 2017 23:50 IST

बीड : बीड नगरपालिकेत सध्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे.

सोमनाथ खताळ। लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड नगरपालिकेत सध्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. बायोमेट्रीक नसल्याने उशिरा यायचे आणि लवकर निघून जायचे, असा काहिसा प्रकार पहावयास मिळत आहे. हाच धागा पकडून मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास ‘लोकमत’ने स्टींग केले. यावेळी बहुतांश विभागातील अधिकारी, कर्मचारी गैरहजर असल्याचे दिसून आले. त्यांच्या रिकाम्या खुर्च्या कॅमेऱ्यात कैद करण्यात आल्या. कार्यालयीन वेळेत दांडी मारत ‘मन का राज’ चालविणाऱ्यांना अभय कोणाचे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.बीड पालिकेतील ‘राजकारण’ गाजत आहे. त्यामुळे पालिका नेहमीच चर्चेत असते. पालिकेतील ठराविक कर्मचाऱ्यांचेही गट पडले आहेत. मुख्याधिकारी नियमित नाहीत. याचाच फायदा घेत पालिकेतील विभाग प्रमुखांसह कर्मचारी सर्रासपणे कार्यालयातून दांडी मारत आहेत. कार्यालयीन वेळेत न येता उशिरा येणे. सायंकाळी लवकर जाणे. एखाद्याने विचारले तर ‘आम्हाला फिल्ड वर्क’ला जावे लागते, असे कारण सांगून वेळ मारून नेली जाते. अशा या कारणांना आणि दांडीबहाद्दरांमुळे पालिकेतील नियोजन बिघडले आहे. कोणाचा कोणावर वचक राहिलेला नाही. जो तो मनमानी कारभार करीत आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. एखादी स्वाक्षरी घ्यायची असेल किंवा तक्रार करायची असेल तर त्यांना अधिकाऱ्यांना सापडण्याची वेळ येत आहे. अशा या दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. बांधकाम विभागात केवळ एक लिपिक हजर होते. इतर अधिकारी गायब होते. पाणीपुरवठा विभागात कनिष्ठ अभियंता राहुल टाळके कामात व्यस्त होते. तर बाहेर एक महिला लिपिक काम करीत होत्या. इतर सर्व कर्मचारी गायब होते. नगर रचना विभागात वेळेवर काम होत नसल्याने अधिकारी, कर्मचारी यांच्यात वादावादी सुरू होती. केवळ दोन ट्रेसर उपस्थित होते. सुवर्ण जयंती विभागात प्रकल्प अधिकारी कुरेशी हे कामात व्यस्त होते. इतर कर्मचारीही काम करताना दिसून आले. वरिष्ठ लिपिक हे कामानिमित्त बाहेर गेल्याचे सांगण्यात आले. वसुली विभागात कर अधीक्षक इद्रीस हे उपस्थित होते. परंतु त्यांच्या विभागातील पाच ते सहा टेबल रिकामे होते. रिकाम्या खुर्च्या पंख्यांची हवा खात होत्या. तर समोर नागरिक त्यांची प्रतीक्षा करीत बसल्याचे दिसून आले.