शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील जलसाठ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:58 IST

बीड जिल्ह्यात पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे मे अखेरनंतर प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ होण्याऐवजी आहे तो पाणीसाठी तब्बल १५ टक्क्यांनी घटला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे मे अखेरनंतर प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ होण्याऐवजी आहे तो पाणीसाठी तब्बल १५ टक्क्यांनी घटला आहे. मे अखेर १४४ जलाशयातील उपयुक्त पाणीसाठा २९.७१ टक्के इतका होता. हा पाणीसाठा सद्यस्थितीत १५.७५ टक्क्यांवर आला आहे. पुरेसा पाऊस नसल्याने जिल्ह्यातील जलसाठे अद्यापही तहानलेलेच आहेत.जिल्ह्यात माजलगाव व मांजरा असे दोन मोठे, १६ मध्यम तर १२६ लघु असे एकूण १४४ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची एकूण पाणी साठवण क्षमता ही ११३५.२३२ दलघमी इतकी असून एकूण उपयुक्त पाणी साठवण क्षमता ८८८.७३६ दलघमी इतकी आहे.या प्रकल्पांमध्ये एकूण उपयुक्त पाणीसाठवण क्षमतेच्या तुलनेत आजघडीला अर्धा पावसाळा संपत आला असताना फक्त १३९.९६२ दलघमी म्हणजेच १५.७५ टक्के इतका पाणीसाठा शेष राहिला आहे. मे अखेर माजलगाव धरणात ३५.८०० दलघमी इतका म्हणजेच २१.०९ टक्के इतका उपयुक्त साठा शिल्लक होता तर मांजरा धरणात ५२.८० दलघमी म्हणजेच २९.७१ टक्के इतका साठा उपलब्ध होता.आजघडीला माजलगाव धरणात केवळ १३.१४ टक्के तर मांजरा धरणात २२.८६ टक्के पाणीसाठा राहिला आहे. अर्धा पावसाळा संपत असताना जिल्ह्यातील १४४ पैकी ७ प्रकल्प कोरडेठाक असून तब्बल ६८ प्रकल्पांमधील पाणी जोत्याखाली गेले आहे.सध्या १३ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणी उपलब्ध आहे. याशिवाय १५ प्रकल्पांमध्ये २५ ते ५० टक्क्यांदरम्यान, ४ प्रकल्पांमध्ये ५० ते ७५ टक्क्यांदरम्यान तर फक्त एका प्रकल्पात ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणी उपलब्ध असल्याची नोंद लाभक्षेत्र विकास प्राधिकरणच्या अहवालात घेण्यात आलीआहे.