शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘श्रीं’च्या पालखीने बीड भक्तिमय

By admin | Updated: July 17, 2017 00:42 IST

बीड : आषाढी एकादशीनंतर पंढरपूर येथून शेगावकडे परतणारी संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे रविवारी बीड शहरात भक्तिभावाने स्वागत करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आषाढी एकादशीनंतर पंढरपूर येथून शेगावकडे परतणारी संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे रविवारी बीड शहरात भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. परंपरेप्रमाणे विठ्ठल मंदिरात पूजेनंतर पालखी कनकालेश्वर मंदिर परिसरात विसावली. पालखी मार्गावर ठिकठिकाणी घरासमोर महिला भाविकांनी काढलेल्या आकर्षक रांगोळीने लक्ष वेधले. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून भाविकांनी श्रींचे शिस्त व शांततेत दर्शन घेतले.सकाळी बार्शी रोड येथून सोमेश्वर मंदिरमार्गे शिवाजी चौकात पालखीचे आगमन झाले. त्या भागातील भाविकांनी उत्साहाने पालखीचे दर्शन घेत सेवा दिली. शिवाजी चौक, पशीरगंज, कारंजा, बलभीम चौक, धोंडीपुरा, माळीवेस, सुभाष रोड, नवा पूल, डॉ. आंबेडकर चौकातून पालखी बालाजी मंदिराच्या सभागृहात पोहोचली. तेथे व्यापारी मंडळातर्फे वारकऱ्यांसाठी भोजन प्रसादाची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर पालखी संस्थान विठ्ठल मंदिरात पोहोचल्यावर तेथे प्रति वार्षिक परंपरेनुसार श्रीं ना नैवैद्य पूजन तसेच आरती करण्यात आली. दरम्यान पालखी मार्गावर वारकऱ्यांना फराळ व उपयोगी साहित्यांचे वाटप स्थानिक भाविकांनी केले. कनकालेश्वर मंदिरात पालखी आगमनानंतर भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती. आंधळकर परिवार आणि भक्त मंडळींच्या वतीने वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. तर रात्री एकनाथ महाराज पुजारी यांच्या कीर्तनानंतर सोमवारी पहाटे पाच वाजता पालखीचे जालन्याकडे प्रस्थान होणार आहे. पालखी सोबत शेगाव ते पंढरपूर आणि परतीच्या प्रवासात खेळणी विक्रेत्यांची जत्रा असते. बच्चे कंपनीला आकर्षित करणारे पावा, फुगे, खेळणी हातगाड्यावर विकणारे पन्नासपेक्षा जास्त विक्रेते यात सहभागी असतात. त्यांच्यासोबत कुटुंबातील सदस्यही असतात. यातून त्यांना चांगला रोजगार मिळतो.