औरंगाबाद : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे सुरू असलेल्या १४ वर्षांखालील निमंत्रित संघांच्या क्रिकेट स्पर्धेत बीड संघाने शिरपूर येथे झालेल्या लढतीत सांगली संघावर १00 धावांनी दणदणीत विजय मिळवला. अन्य लढतीत नंदूरबार संघाने धुळे येथील लढतीत पुण्याच्या डीवाय पाटील संघावर १0 गडी राखून मात केली.शिरपूर येथील लढतीत बीड संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात २७१ धावा फटकावल्या. त्यांच्याकडून सचिन धस याने ६५, सौरभ शिंदे याने ६२ आणि रोहन काटकर याने ५४ धावांची खेळी केली. सांगलीकडून पराग यादवने ५१ धावांत ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात सांगलीचा पहिला डाव ९६ धावांत आटोपला. त्यांच्याकडून पराग यादवने सर्वाधिक ३४ धावा केल्या. बीडकडून सचिन धस याने २१ धावांत ४, रोहन काटकरने ९ धावांत ३ गडी बाद केले. त्यानंतर बीडने सांगलीला फॉलोआॅन देताना त्यांचा दुसरा डावही ७५ धावांत गुंडाळताना शानदार विजय मिळवला. सांगलीकडून दुसºया डावात पराग यादवने २२ व धवल पाटीलने ३0 धावा केल्या. बीडकडून प्रज्वल एस. याने २४ धावांत ४ व शिवराज आणि सचिन धस यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.धुळे येथे डीवाय पाटीलने पहिल्या डावात १२१ धावा केल्या. त्यांच्याकडून अनिरुद्ध साबळेने ७५ धावा केल्या. नंदूरबारकडून तन्मय शाह याने १९ धावांत ५ गडी बाद केले. प्रत्युत्तरात नंदूरबारने पहिल्या डावात २११ धावा केल्या. त्यांच्याकडून यशराज कोरकोचे याने ७३ व आयुष भांडारकरने ३७ धावा केल्या. पहिल्या डावात पिछाडीवर पडलेला डी. वाय. पाटील संघ दुसºया डावात ९४ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून अनिरुद्ध साबळेने ३६ धावा केल्या. नंदूरबारकडून यशराच कोरकोचे याने २0 धावांत ६ गडी बाद केले. नंदूरबारने विजयी लक्ष्य बिनबाद ५ धावा करीत गाठले.
बीडचा सांगलीवर दणदणीत विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 23:44 IST
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे सुरू असलेल्या १४ वर्षांखालील निमंत्रित संघांच्या क्रिकेट स्पर्धेत बीड संघाने शिरपूर येथे झालेल्या लढतीत सांगली संघावर १00 धावांनी दणदणीत विजय मिळवला.
बीडचा सांगलीवर दणदणीत विजय
ठळक मुद्दे१४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा : नंदूरबारकडून डीवाय पाटील संघ पराभूत