बीड : जिल्हा रूग्णालयात दाखल असलेल्या रूग्णांना संसर्ग होऊ नये यासाठी वॉर्डातील स्वच्छता महत्त्वाची आहे. मात्र खाटावर टाकलेले बेडशीट धुण्याची मशीन अनेक महिन्यांपासून बंद असल्याने रूग्णांना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. याकडे रूग्णालय प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष असल्याचे चित्र मंगळवारी पहावयास मिळाले.चार दिवसांपूर्वी येथील नेत्र विभागात संसर्गामुळे पाच जणांच्या दृष्टीला धोका निर्माण झाला होता. हे प्रकरण लक्षात घेऊन प्रत्येक वॉर्डात स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. मात्र इतर वॉर्डांची स्वच्छतेच्या बाबतीत अत्यंत दयनीय आवस्था आहे. अक्षरश: मागील दोन महिन्यांपासून वॉर्डातील खाटांवरचे बेडशीट आठ-आठ दिवस बदलले जात नाही. यामध्ये डिलेवरी वार्डात स्वच्छतेचा अभाव आहे. येथील बेडशीट देखील आठ-आठ दिवस बदलले जात नाहीत. यामुळे रूग्णांना संसर्गाचा मोठा धोका निर्माण झाला आहे.शस्त्रक्रियेसाठी लागणारे कपडेही वेळेवर धुतले जात नाहीत. शिवाय कपडे धुण्याची मशीन बंद असल्याने टॉवेल व इतर कपडे लवकर मिळत नसल्याचे देखील काही डॉक्टरांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)
बेडशीट धुण्याची मशीन दोन महिन्यांपासून बंद
By admin | Updated: April 27, 2016 00:25 IST