औरंगाबाद : जीवनात केवळ पदवी किंवा नोकरी मिळविणे एवढेच ध्येय ठेवू नका. ते एक जगण्याचे माध्यम आहे. आयुष्यात एक चांगला माणूस बना. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. या माध्यमातून देश, समाज आणि मानवतेची सेवा करा. या देशाला सशक्त राष्ट्र बनविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन ‘नॅक’चे संचालक डॉ. डी.पी. सिंह यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ५६ वा वार्षिक दीक्षांत समारंभ रविवारी झाला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरूडॉ. बी. ए. चोपडे होते. व्यासपीठावर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य तथा ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. के. व्ही. काळे, कुलसचिव डॉ. मुरलीधर लोखंडे, तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. महेश शिवणकर, डॉ. राजेंद्र धामणस्कर, डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. सय्यद अझरुद्दीन आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. प्रारंभी कुलगुरूंच्या मान्यतेने समारंभ सुरूझाला. बीसीयूडीचे संचालक डॉ. के.व्ही. काळे यांनी पदव्यांचा अनुग्रह केला. या समारंभात १७६ जणांना पीएच.डी प्रदान करण्यात आली. दीक्षांत मिरवणुकीद्वारे प्रमुख पाहुणे डॉ. सिंह, कुलगुरू डॉ. चोपडे, परीक्षा नियंत्रक डॉ. लुलेकर व अन्य मान्यवरांचे आगमन नाट्यगृहात झाले. यावेळी डॉ. डी.पी. सिंह यांनी दीक्षांत भाषण केले. ते म्हणाले, प्रत्येक पदवीधराच्या आयुष्यात दीक्षांत समारंभ हा संस्मरणीय क्षण असतो. पदवीनंतरच माणसाचे नवे आयुष्य सुरूहोत असते, यासाठी मी शुभेच्छा देतो. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तरी (पान २ वर)
सशक्त राष्ट्रासाठी चांगला माणूस बना
By admin | Updated: March 28, 2016 00:02 IST