शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीमुळे जिल्ह्यात सहमतीचे राजकारण मजबूत

By admin | Updated: January 29, 2017 23:52 IST

लातूर :स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी झाली असल्याचे आमदार दिलीपराव देशमुख यांनी रविवारी येथे पत्रपरिषदेत सांगितले़

लातूर : काँग्रेस आणि राष्ट्रवादीची विचारधारा एक असून दोघांचेही ध्येय एक आहे़ त्यामुळे मन आणि विचारांनी आम्ही एकत्र आलो आहोत़ विकासाचा अजेंडा अखंड ठेवण्यासाठी जिल्ह्यात सहमतीचे राजकारण आम्ही यापूर्वीही केले आहे आणि पुढेही करत राहू़ धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमची आघाडी झाली असल्याचे आमदार दिलीपराव देशमुख यांनी रविवारी येथे पत्रपरिषदेत सांगितले़ स्थानिक स्वराज्य संस्था सक्षमपणे चालल्या पाहिजेत़ त्यामुळे या निवडणुकीत सक्षम उमेदवाराबरोबर चारित्र्यसंपन्न उमेदवार देण्यावर दोन्हीही पक्षांचा भर राहणार आहे़ जिल्ह्यात सहमतीच्या राजकारणाची परंपरा आहे़ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आ़ बाबासाहेब पाटील आणि मी जिल्हा परिषद, जिल्हा बँकेत गेल्या ३० वर्षांपासून काम करीत आहोत़ त्यामुळे आघाडी करणे सोपे झाले़ वरिष्ठ नेत्यांसमवेत चर्चा करून ही आघाडी झाली आहे़ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी यापूर्वी विधानसभा व लोकसभेसाठी झाली होती़ स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पहिल्यांदाच आघाडी होत आहे़ तीही राज्यात सर्वप्रथम लातुरात आघाडी झाली आहे़ स्थानिक पातळीवर स्वतंत्र लढलो होतो़ आता आघाडी झाल्याने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर सहज काँग्रेस, राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल, असा विश्वासही आ. दिलीपराव देशमुख यांनी व्यक्त केला़ हल्ली निवडणुका विकास व कार्यक्रमांपेक्षा धर्म, संस्कृती आणि जाती-पातीवर होत आहेत़ ही चिंताजनक बाब आहे़ जाती-पातीच्या आणि धर्माच्या नावावर निवडणुका होत असल्याने दरी निर्माण होण्याची शक्यता आहे़ ही चुकीची प्रथा रोखण्याची जबाबदारी निधर्मी पक्षांवर आहे़ सर्वाधिक जबाबदारी काँग्रेस पक्षाची असल्याचेही आ़ दिलीपराव देशमुख म्हणाले़