शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

बीड पालिकेत अनागोंदी !

By admin | Updated: June 9, 2017 00:58 IST

बीड : येथील नगरपालिकेतील गैरव्यवहार गुरुवारी उपनगराध्यक्ष, सभापती व नगरसेवकांनी चव्हाट्यावर आणला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येथील नगरपालिकेतील गैरव्यवहार गुरुवारी उपनगराध्यक्ष, सभापती व नगरसेवकांनी चव्हाट्यावर आणला आहे. लेखा विभागातील कॅशबूक व संचिकांची मागील पाच महिन्यांपासून कसलीच नोंद नसल्याची धक्कादायक माहिती त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. नोंद नसल्याने लाखोंचा व्यवहार खाजगीत झाल्याचा आरोप उपनगराध्यक्षांनी केला आहे. रात्री उशिरापर्यंत हे सर्वजण जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून होते. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.बीड नगरपालिका मागील निवडणुकीपासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. पुन्हा एकदा लेखा विभागातील गैरकारभारावरून पालिका चर्चेत आली आहे. गुरुवारी दुपारी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, पाणीपुरवठा सभापती फारुख पटेल व बांधकाम सभापती अमर नाईकवाडे यांनी लेखा विभागातील माहिती मागविली असता लेखापालास ती देता आली नाही. गुरुवारी दिवसभरात पालिकेत १ लाख २० हजार रुपये रक्कम जमा झाली होती. ही रक्कम कुठे आहे, असे हेमंत क्षीरसागर यांनी लेखापालास विचारले असता त्यांची भंबेरी उडाली. उत्तर देताना हातात केवळ ५० हजार रुपयेच असल्याचे दिसले. राहिलेले ७० हजार रुपये कुठे गेले, याबाबत विचारणा केली असता पालिकेतीलच एका कंत्राटी महिला कर्मचाऱ्याला दिल्याचे लेखापालाने कबूल केले. पालिकेतील अनागोंदी कारभारामुळे चिडलेल्या उपनगराध्यक्ष, सभापती व नगरसेवकांनी लेखापालासह थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. येथे पुराव्यानिशी हा सर्व प्रकार जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिला. तसेच पालिकेतील इतर सोयी-सुविधा व गैरकारभाराचा पाढाच त्यांनी यावेळी वाचून दाखविला. हे ऐकून उपस्थितही अवाक झाले.लेखापाल गणेश पगारे यांची अंबाजोगाईला बदली झाली आहे; परंतु त्यांनी अद्यापही संचिका, कॅशबूक व इतर महत्त्वाचे दस्तऐवज पालिकेकडे सुपुर्द केले नाहीत. तसेच पालिकेतही ते येत नाहीत. घरी बसून लाखोंचे व्यवहार नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या सांगण्यावरून करीत असल्याचा आरोप उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर व अमर नाईकवाडे यांनी केला आहे.नगराध्यक्षांविरोधात आरोपजिल्हाधिकाऱ्यांसमोर तक्रारींचा पाढा वाचत असताना पालिकेतील सर्व गैरव्यवहार हे नगराध्यक्ष यांच्या सांगण्यावरूनच अधिकारी, कर्मचारी करीत असल्याचा आरोप हेमंत क्षीरसागर, अमर नाईकवाडे, फारूख पटेल यांनी केला. यावेळी बाळासाहेब गुंजाळ, इद्रिस हाश्मी, भैय्या मोरे, रणजित बनसोडे, प्रभाकर पोपळे, सम्राट चव्हाण, गणेश तांदळे, जैतुल्ला खान यांच्यासह लेखा विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तसेच मुख्याधिकारीही यात दोषी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.