शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘बांधिलकी जपणाऱ्यांच्या पाठीशी राहा’

By admin | Updated: November 16, 2016 00:33 IST

बीड :डॉ. क्षीरसागर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी केले.

बीड : दूरदृष्टी ठेवून शहराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बीड शहराचा विकास करणाऱ्या डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासलेली आहे. सर्व जातीधर्माला बरोबर घेऊन विकासाच्या दिशेने ते जात आहेत. डॉ. क्षीरसागर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी केले.बीड नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा प्रारंभ राकाँचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मंगळवारी झाला. यावेळी ते बोलत होते. मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. अमरसिंह पंडित, राकाँचे उपनेते आ. जयदत्त क्षीरसागर, आ. विक्रम काळे, माजी आमदार उषा दराडे, माजी आ. जनार्दन तुपे, रायुकाँचे शेख शफीक, नवीदुज्जमा, नगराध्यक्षा रत्नमाला दुधाळ, माजी नगराध्यक्षा डॉ. दीपा क्षीरसागर, हेमा पिंपळे आदींची उपस्थिती होती. तटकरे बोलताना म्हणाले, बीड जिल्ह्यात सातत्याने दुष्काळ पडला. अशा स्थितीत बीड शहरात टँकर लावावे लागले नाही, याचा मला अभिमान वाटतो. महाराष्ट्रात केवळ बीडमध्येच महिला बचतगटाची चळवळ सक्रिय आहे. महिलांना लघु उद्योगातून चालना देण्याचे काम डॉ. भारतभूषण क्षीरसागर व त्यांच्या टीमने आतापर्यंत केलेले आहे. सत्ताही उपभोगायचे साधन नाही. सत्तेत असताना सर्वसामान्य जनतेची कामे झाली पाहिजेत, ही पवारसाहेबांची शिकवण आहे. बीडमध्ये डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी शहराचा विकास करुन दाखविला आहे. येणाऱ्या काळात उर्वरित कामे देखील मार्गी लागतील, असे ते म्हणाले.कार्यक्रमाचे अध्यक्ष अमरसिंह पंडित म्हणाले, शहरातील संघर्षशील नेतृत्व म्हणून डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्याकडे पाहिले जाते. शहरातील जनता डॉ. क्षीरसागर यांच्यावर विश्वास ठेवते, असे सांगून त्यांनी बीडमध्ये डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.गेवराईकरांनो, सेवेची संधी द्या !राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत गेवराईतही राकाँच्या प्रचाराचा नारळ फुटला. यानिमित्ताने शहरातून कार्यकर्त्यांची रॅली काढण्यात आली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना आ. तटकरे म्हणाले, सत्ता ही कोणा एकाची बांधिलकी नाही. जनतेची सेवा करण्याची ही एक संधी असते. ही संधी गेवराईकरांनी राकाँला द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.दुष्काळी परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीने सरकारसमोर शेतकऱ्यांचे प्रश्न नेटाने लावून धरले. जनतेच्या सुखदु:खाची राकाँला जाणीव आहे. त्यामुळे मतदारांनी भावनेच्या आहारी न जाता विकासाची क्षमता असलेल्या राकाँ उमेदवारांनाच निवडून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी आ. अमरसिंह पंडित, आ. विक्रम काळे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार मनोहर पिसाळ, जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, बप्पासाहेब मोटे, श्याम येवले, समाधान मस्के, शांतीलाल पिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आ. अमरसिंह पंडित यांचेही भाषण झाले. (प्रतिनिधी)