शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
2
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
4
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
5
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
6
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
7
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
8
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
9
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
10
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
11
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
12
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
13
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
14
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
15
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
16
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
17
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
18
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
19
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
20
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद

जवळा येथे दारू विक्रेत्यास बेदम चोप

By admin | Updated: April 27, 2015 00:57 IST

शिराढोण : महिला, ग्रामस्थांनी गावात कायदेशीर मार्गाने दारूबंदी केलेली असतानाही एक जण अवैधरित्या दारू विक्री करीत होता़ वारंवार सूचना देवूनही दारूविक्रीचा धंदा सुरूच ठेवणाऱ्या

शिराढोण : महिला, ग्रामस्थांनी गावात कायदेशीर मार्गाने दारूबंदी केलेली असतानाही एक जण अवैधरित्या दारू विक्री करीत होता़ वारंवार सूचना देवूनही दारूविक्रीचा धंदा सुरूच ठेवणाऱ्या त्या दारूविक्रेत्यास जवळा (खु़ ताक़ळंब) ग्रामस्थांनी रविवारी सकाळी चांगलाच चोप दिला़ याप्रकरणी शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, जखमी झालेल्या दारूविक्रेत्याने ग्रामस्थांविरोधातही मारहाणीची तक्रार दिली आहे़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जवळा खुर्द येथील ग्रामस्थांनी मागील काही महिन्यापूर्वी ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव घेवून दारूबंदी लागू केली आहे़ मात्र, गावाच्या परिसरात फुलचंद जलद्या पवार हा सुभाष पवार यांच्या शेतातील मोसंबीच्या बागेजवळ अवैधरित्या दारूविक्री करीत होता़ याबाबत ग्रामस्थांनी त्याला दारूविक्री बंद करण्याबाबत वारंवार सूचना केल्या होत्या़ मात्र, सतत सूचना करूनही पवार ऐकत नसल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी रविवारी सकाळीच त्याला चांगलाच चोप दिला़ दारूविक्रीवरून जवळा खुर्दमध्ये गोंधळ झाल्याची माहिती मिळताच शिराढोण पोलीस ठाण्याचे सपोनि संभाजी पवार हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले़ त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता तेथे दारू निर्मितीसाठी लागणारे साहित्य, ४०० लिटर रसायन आढळून आले़ पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून फुलचंद पवार याला ताब्यात घेतले़ याबाबत सपोनि संभाजी पवार यांनी फिर्याद दिली असून, पवार याच्याविरूध्द शिराढोण पोलीस ठाण्यात कलम ६५ (क) दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ग्रामस्थांच्या मारहाणीत फुलचंद पवार हा जखमी झाला होता़ त्याला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ दरम्यान, फुलचंद पवार यानेही ग्रामस्थांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार शिराढोण पोलीस ठाण्यात दिली आहे़ त्याच्या फिर्यादीवरून साहेबराव आनंदराव पवार, सुभाष बब्रुवान पवार, धोंडीराम अंबऋषी समुद्रे, दिलीप नामदेव हंडीबाग, बाबा पांडुरंग पवार, परसराम बालाजी भोरे, विशाल बाबासाहेब पवार, अशोक उत्तम लोमटे व बालाजी मुरली पवार यांच्याविरूध्द शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोना सुनिल ईगवे, विजयकुमार राठोड हे करीत आहेत़ (वार्ताहर)