शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
4
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
5
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
6
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
7
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
8
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
9
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
10
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
11
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
12
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
13
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
14
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
15
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
16
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
17
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
18
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
19
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
20
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

बसथांबे मुबलक; निवाऱ्यांची वानवा

By admin | Updated: July 14, 2014 01:01 IST

कळंब : तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्गासह राज्य मार्गावर बसथांब्यांची मोठी संख्या असताना प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी निवारे मात्र बोटावर मोजण्याइतपतच उपलब्ध आहेत.

कळंब : तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्गासह राज्य मार्गावर बसथांब्यांची मोठी संख्या असताना प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी निवारे मात्र बोटावर मोजण्याइतपतच उपलब्ध आहेत. त्यांचीही एकतर दुरवस्था होऊन मोडकळीस आले आहेत किंवा त्यावर अतिक्रमण झाले आहे.तालुक्यातील कळंब-येरमाळा राज्य मार्गावर हासेगाव, आंदोरा, कन्हेरवाडी, मनुष्यबळ पाटी, दहिफळ पाटी, परतापूर, उमरा, पानगाव तर कळंब-ढोकी राज्य मार्गावर डिकसळ, माळकरंजा, गोविंदपूर, भाटशिरपुरा ही गावे तसेच मंगरूळ, जवळा, एकुरगा, बोरवंटी व देवळाली या गावांच्या पाट्या आहेत. लातूर-कळंब-डोंगरेवाडी या राज्य मार्गावरही रांजणी, ताडगाव, आवाड शिरपुरा, कोथळा, खडकी, लोहटा (पूर्व व पश्चिम), करंजकल्ला, भाटसांगवी, खोंदला, आथर्डी, बहुला, आढळा, भोगजी, चौफुला आदी बसथांबे आहेत. याशिवाय तांदूळवाडी, बोर्डा, मोहा, सातेफळ, शेलगाव, वडगाव ही गावे कळंब-येडशी राज्य मार्गावर येतात. प्रमुख जिल्हा मार्गावरही ईटकूर, हावरगाव, वाकडी, गंभीरवाडी, दहिफळ आदी प्रमुख गावे असून ही गावे लगतच्या मोठ्या गावास अथवा तालुका किंवा जिल्हा ठिकाणाला जोडली आहेत. तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे जाळे पसरलेले असताना आंदोरा-मस्सा (खं), कन्हेरवाडी पाटी, ईटकूर, गोविंदपूर, रांजणी, मोहा आदी बोटावर मोजण्याइतपत गावातच प्रवासी निवाऱ्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. तर शिराढोण व येरमाळा येथे मिनी बसस्थानक आहे. बसथांब्यावर प्रवासी निवारा नसल्याने उन्हाळा व पावसाळ्यात प्रवाशांना समस्यांना सामोरे जावे लागते. विशेषत: हावरगाव, वाकडी, कोठाळवाडी, मंगरूळ पाटी, देवळाली पाटी, शिंगोली, ताडगाव, आवाड शिरपुरा, मंगरूळ पाटी, जवळा पाटी, शेलगाव (दि), चोराखळी, वडगाव (ज) येथील प्रवाशांना प्रवासी निवारा नसल्याने अधिक त्रास सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)यापूर्वी आमदार, खासदार हे लोकप्रतिनिधी स्थानिक विकास निधीतून प्रवासी निवाऱ्यासाठी निधी उपलब्ध करून देत होते. राज्य परिवहन महामंडळही निधीचे कारण सांगून व त्यांच्या स्थापत्य विभागावर जबाबदारी ढकलून मोकळे होत होते. सद्यस्थितीत या दोघांचेही दुर्लक्ष झाल्याने नवीन निवारे तर सोडाच, परंतु आहे त्या निवाऱ्यांचीही देखभाल होत नसल्याचे दिसत आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनीच पुढाकार घेण्याची गरजही जाणकारांतून व्यक्त होत आहे.