शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

बनावट सह्यांच्या आधारे साडेचार लाखांचा अपहार

By admin | Updated: May 26, 2016 00:05 IST

औरंगाबाद : तब्बल ४ लाख ६० हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी बंजारा कॉलनी वसतिगृहाच्या दोन पदाधिकाऱ्यांविरोधात क्रांतीचौक ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला

औरंगाबाद : बनावट सह्या करून बोगस ठरावाच्या आधारे कागदपत्रे तयार करून तब्बल ४ लाख ६० हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी बंजारा कॉलनी वसतिगृहाच्या दोन पदाधिकाऱ्यांविरोधात क्रांतीचौक ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला.मीराबाई लालसिंग चव्हाण आणि संजय भीमराव चव्हाण (दोन्ही रा. बंजारा कॉलनी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, बंजारा कॉलनी येथे समाजकल्याण विभागाकडून अनुदानप्राप्त बंजारा विद्यार्थी वसतिगृह आहे. आरोपी हे संस्थेचे पदाधिकारी असताना त्यांनी २००३-१४ या कालावधीत खोटे आणि बोगस लेटर दाखवून त्यात तक्रारदार पंडित भिका जाधव (रा. बंजारा कॉलनी) यांच्या बनावट सह्या केल्या. बनावट सह्याच्या आधारे शपथपत्र तयार केले. हे शपथपत्र आणि अन्य कागदपत्रे जिल्हा परिषद समाजकल्याण विभागात सादर केले. त्याआधारे शासनाकडून प्राप्त ४ लाख ६० हजार रुपयांचा अपहार केला. तसेच संस्थेची कागदपत्रे व्यवस्थित ठेवली नाहीत. विद्यार्थ्यांना व्यवस्थित सुविधा दिल्या नाही. शिवाय आरोपींनी धमक्या दिल्याची आणि संस्थेच्या जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार जाधव यांनी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने याप्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश क्रांतीचौक पोलिसांना दिले आहेत. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू केल्याची माहिती पोलीस निरीक्षक गोवर्धन कोळेकर यांनी दिली.