शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तळीरामांना मिळतोय बसस्थानकाचा आधार

By admin | Updated: May 22, 2017 23:33 IST

माजलगाव : येथील बसस्थानक परिसरात संपुर्ण अंधार असल्यामुळे याचा फायदा अनेकजण वेगवेगळया कारणांसाठी उचलत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : येथील बसस्थानक परिसरात संपुर्ण अंधार असल्यामुळे याचा फायदा अनेकजण वेगवेगळया कारणांसाठी उचलत आहेत. दारुची दुकाने बंद असल्याने रात्रीच्या वेळी अनेक तळीराम येथे तळ ठोकून दारु पित बसल्याचे सर्रास आढळून येत आहेत. तसेच सर्वत्र अंधार असल्याने येथे आलेल्या प्रवाशी महिलांची छेडछाडीचे प्रकार बसस्थानकात वाढल्यामुळे प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. माजलगाव आगाराला मागील दोन वर्षांपासून कायमस्वरुपी आगार प्रमुख नसल्याने या ठिकाणचा कारभार बसस्थानकातील इतर कर्मचाऱ्याला सांभाळावा लागतो. त्यामुळे अधिकार मर्यादा येत असल्याने या ठिकाणच्या सोयीसुविधांकडे प्रभारी असलेल्या आगार प्रमुखाला लक्ष देता येत नाही. आगाराचा कारभार कसा चालवायचा तसेच आगारातील सुविधांबाबत कोणाशी व कसा पत्रव्यवहार करायचा याची माहिती नसल्यामुळे आगारात असलेल्या एक एक सुविधा बंद पडत चालल्या आहेत. त्यातच ज्या ठिकाणी प्रवाशी बसतात तेवढी जागा वगळता परिसरात सर्वत्र अंधार पसरलेला आहे. सध्या शहरातील जवळपास सर्वच दारुची दुकाने ही बंद असल्यामुळे तळीरामांना दारू पिण्यासाठी इतरत्र जागा राहिलेली नाही. त्यामुळे ते बसस्थानकात असलेल्या अंधाराचा फायदा घेत आहेत. दारु पिण्यासाठी चक्क बसस्थानक परिसरात बारमध्ये बसल्याप्रमाणे गोल राऊंडने बसून दारु पिण्याचा नवीन फंडा चालू केला आहे. बसस्थानकाच्या आवारात मुख्य रस्त्यालगत अनेकांनी अतिक्र मणे करु न या ठिकाणी दुकाने थाटली आहेत या दुकानांमधून अनेकजण अवैधरीत्या दारु या तळीरामांना पुरवित आहेत. यामुळे तळीरामांसाठी जागे बरोबरच दारु उपलब्ध होत असल्याने या ठिकाणी रात्रीच्या वेळी बसणा-यांच्या संख्येत वाढ झालेली दिसत आहे. लग्नसराईचे दिवस असल्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करीत असल्यामुळे रात्री प्रवाशांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे. प्रवाशी महिलांना अंधारातच शौचास जाण्याची वेळ येत आहे. त्यातही काही तरुण महिलांची छेड काढताना पहावयास मिळतात. दोन दिवसांपूर्वीच चोरट्यांनी पोलिसांना देखील चांगलाच चोप दिला. त्यामुळे शहर पोलीस कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरताना दिसत आहेत.