येणेगूर : मुरूम येथील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी औशाचे आमदार बसवराज पाटील यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली़ तर व्हा़चेअरमनपदी सादिकमियाँ काझी यांचीही बिनविरोध निवड झाली़मुरूम येथील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली होती़ निवडणुकीनंतर चेअरमन, व्हा़चेअरमन निवडीसाठी कारखानास्थळावर गुरूवारी बैठक घेण्यात आली़ यावेळी चेअरमनपदी आ़ बसवराज पाटील, व्हा़चेअरमनपदी सादिकमियाँ काझी यांची बिनविरोध निवड करण्यात आली़ यावेळी पीठासन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार उत्तमराव सबणीस यांनी काम पाहिले़ निवडीनंतर उपस्थितांच्या हस्ते चेअरमन, व्हा़चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला़ यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन बापूराव पाटील, बाबूराव शेळके, प्राचार्य सोमनाथ आकूसकर, प्राचार्य गरूड, संचालक विठ्ठलराव बदोले, माणिकराव राठोड, दिलीप भालेराव, किसन पवार, संगमेश्वर घाळे, शिवमूर्ती भांडेकर, शरणाप्पा पत्रिके, चंद्रकांत साखरे आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)
‘विठ्ठलसाई’च्या चेअरमनपदी बसवराज पाटील
By admin | Updated: March 27, 2015 00:39 IST