शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बँकांतील कामकाज ठप्प

By admin | Updated: June 22, 2017 23:17 IST

पाथरी : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असताना बीएसएनएलचे केबल १७ जून रोजी तुटले आहे. त्यामुळे शहरातील सर्वच बँकेतील आॅनलाईन व्यवहार ठप्प झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असताना बीएसएनएलचे केबल १७ जून रोजी तुटले आहे. त्यामुळे शहरातील सर्वच बँकेतील आॅनलाईन व्यवहार ठप्प झाले आहेत. परिणामी ग्राहकांना चार दिवसांपासून गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पाथरी शहरातून राष्ट्रीय महामार्ग २२२ जातो. सध्या या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. १७ जून रोजी शासकीय विश्रामगृह आणि पोलिस ठाण्यादरम्यानचे काम करताना बीएसएनएलची केबल तुटली आहे. त्यामुळे अगोदरच आठ दिवसांपासून सलाईनवर कामकाज सुरू असलेल्या शहरातील स्टेट बँक आॅफ हैदराबाद, महाराष्ट्र ग्रामीण बँक, भारतीय स्टेट बँक, बँक आॅफ महाराष्ट्र या प्रमुख बँकेतील इंटरनेट सेवा खंडित झाली आहे. त्यामुळे आॅनलाईन कामकाज बंद पडले. सर्व व्यवहार ठप्प झाल्याने तसेच शनिवारी पैसे काढता न आल्याने ग्राहकांना मन:स्ताप सहन करावा लागला. रविवारी इंटरनेट सेवा सुरू होईल, असे वाटत होते. परंतु, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरूवार असे सलग चार दिवस बँकेतील व्यवहार बंदच होेते. भारतीय स्टेट बँकेने तर गेट बंद करून आत कामकाज सुरू केले होते. तर व्यवहार सुरळीत होतील, या आशेने ग्राहक दिवसभर चकरा मारीत होते. आॅनलाईन कामकाज कधी सुरू होईल? याचे उत्तर मात्र बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे नव्हते. या संदर्भात २२ जून रोजी भारतीय स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकासह सर्वच कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी यांची भेट घेऊन इंटरनेट सेवा सुरू करण्यासंदर्भात समस्या मांडल्या. तसेच तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, बंदचे तांत्रिक कारण असले तरी ग्राहकांची मात्र मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.