कळमनुरी : येथील लमाणदेव मंदीर सर्व सोयींनी युक्त करून बंजारा समाजातील वाईट चालिरीती बंद केल्या पाहिजेत, असे प्रतिपादन लमाणदेव सांस्कृतिक सभागृह व नगर परिषदेच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाची सुरूवात करताना अन्न व औषधी प्रशासन मंत्री मनोहर नाईक यांनी शनिवारी केले.या कार्यक्रमास खा. राजीव सातव, माजी मंत्री रजनीताई सातव, जकी कुरेशी, दिलीप देसाई, आदिवासी युवक कल्याण संघाचे राज्याध्यक्ष डॉ.संतोष टारफे, नगराध्यक्षा यास्मीनबी, उपनगराध्यक्ष म. नाजीम, जिल्हाधिकारी तुकाराम कासार, तहसीलदार कृष्णकांत चिकुर्ते, हफीज फारुकी, अॅड. अझहरोद्दीन कादरी, अजीत मगर, शे. फारुक शेख कलीम, हुमायून नाईक, मुख्याधिकारी के.एम. विरकुंवर, शेख बाबा, निहाल कुरेशी, शेख मोईन, रामधन राठोड, हमीदुल्ला पठाण, खाजा बागवान आदी उपस्थित होते. नाईक म्हणाले की, शहर व ग्रामीण भागाचा पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे. मंदीर परिसरातील अतिक्रमण काढण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. तीनशे वर्षापासून कोणीही सात महाराजांच्या मंदिरांचा विकास केलेला नाही. खा.सातव कर्तबगार असल्याने या भागाचा विकास करू शकतात. बंजारा समाजाने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असे नाईक म्हणाले.यावेळी सातव म्हणाले की, या योजनेमुळे शहरवासियांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळेल. शहरातील नुरीबाबा, महादेव मंदिर, तुळजा भवानी, लमानदेव या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी ७५ कोटींचा आराखडा मंजुरीसाठी शासनाकडे पाठवित आहे. विरोधी पक्षाचे सरकार असले तरी विकास केला जाईल. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. नांदेड- अकोला रस्ता चौपदरीकरण, जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. यावेळी रजनीताई सातव, जकी कुरेशी, उत्तमराव राठोड, भागोराव राठोड, जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांची समायोचित भाषणे झाली. प्रास्ताविक नंदकिशोर तोष्णीवाल तर सुत्रसंचालन प्रा. आनंद पारडकर यांनी केले. आभार अरुण वाढवे यांनी मानले. (वार्ताहर)
बंजारा समाजाने वाईट चालीरिती सोडाव्यात
By admin | Updated: August 10, 2014 01:30 IST