शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी बेंबळीकरांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा

By admin | Updated: October 22, 2016 00:32 IST

उस्मानाबाद : परतीच्या पावसामुळे बेंबळी गावाला पाणीपुरवठा करणारा रूईभर प्रकल्प तुडूंब भरला आहे़ प्रकल्प भरून महिन्याचा कालावधी लोटला तरी

उस्मानाबाद : परतीच्या पावसामुळे बेंबळी गावाला पाणीपुरवठा करणारा रूईभर प्रकल्प तुडूंब भरला आहे़ प्रकल्प भरून महिन्याचा कालावधी लोटला तरी ग्रामपंचायत प्रशासन सुरळीत पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला़उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी गावात मागील वर्षानुवर्षापासून पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर आहे़ रूईभर येथील पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यानंतर पाणीप्रश्न काही अंशी मार्गी लागला होता़ मात्र, मागील तीन-चार वर्षापासून पावसाने ओढ दिल्याने रूईभर येथील साठवण तलाव कोरडाठाक पडला होता़ परिणामी गावाला सहा टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला़ परतीच्या पावसामुळे कोरडाठाक पडलेला रूईभर प्रकल्प तुडूंब भरला़ मात्र, पाणीपुरवठा योजनेचे साहित्य चोरीस गेल्याने मागील महिनाभरापासून गावातील पाणीपुरवठा बंदच होता़ तलाव भरलेला असतानाही गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती़ तर अनेकांना विकत पाणी घेवून तहान भागवावी लागत होती़ ही बाब पाहता काही ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी पाणीपुरवठा तत्काळ सुरू करा अन्यथा ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता़ दिलेल्या मुदतीत गावातील पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने शुक्रवारी गावातील हनुमान चौकातून ग्रामपंचायतीवर घागरमोर्चा काढण्यात आला़ मोर्चेकऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना धारेवर धरून त्वरित पाणीपुरवठा सुरळीत करण्यासह इतर मागण्या लावून धरल्या़ ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर मोर्चेकरी परतले़ या मोर्चात माजी उपसरपंच बाळासाहेब माने, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद पाटील, संतोष आगलावे, नवाब पठाण, पांडुरंग पाटील, चेअरमन सोमनाथ गवळी, पांडुरंग पवार, नवनाथ कांबळे, कमलाकर दाणे, तुकाराम राऊत, शहाजान मुजावर, सतिश सोनटक्के, सलीम शेख यांच्यासह ग्रामस्थ, युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ (प्रतिनिधी)