शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सराफा बाजारातील कोट्यवधींचा व्यवहार ठप्प

By admin | Updated: March 15, 2016 01:02 IST

श्रीनिवास भोसले , नांदेड सोन्यावरील अबकारी कर रद्द करण्याच्या मागणीसाठी सराफा व्यापारी आणि सुवर्णकारांनी पुकारलेल्या बंदमुळे नांदेड सराफा बाजारातील कोट्यवधींचा व्यवहार ठप्प झाला आहे़

श्रीनिवास भोसले , नांदेड सोन्यावरील अबकारी कर रद्द करण्याच्या मागणीसाठी सराफा व्यापारी आणि सुवर्णकारांनी पुकारलेल्या बंदमुळे नांदेड सराफा बाजारातील कोट्यवधींचा व्यवहार ठप्प झाला आहे़ गत चौदा दिवसांत अंदाजे ३० ते ३५ कोटी रूपयांची उलाढाल थांबल्याने व्यापाऱ्यांना लाखो रूपयांच्या उत्पन्नाला मुकावे लागले़ जिल्ह्यात जवळपास सोन्या-चांदीची १४०० दुकाने असून यातील २७० दुकाने नांदेड शहरात आहेत़ याठिकाणी काम करणाऱ्या सुवर्णकार आणि कारागिरांची संख्या साडेचार हजारांच्या घरात आहे़ अबकारी कराच्या विरोधात सुरू असलेल्या बंदमुळे या कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे़ १९६२ ते १९९२ या कालावधीत अबकारी कराच्या जाचक अटीमुळे अशिक्षित सुवर्णकार अडचणीत सापडला होता़ याच कालावधीत अनेक सुवर्णकारांनी आपली दुकाने बंद करून मिळेल ती नोकरी करणे पसंद केले़ तर या तीस वर्षांच्या कालावधीत १०९ सुवर्णकारांनी आत्महत्या केली होती़ दरम्यान, १९९२ मध्ये हा कायदा रद्द करण्यात आला़ मात्र, भाजपा सरकारने पुन्हा तो कायदा आणल्याने त्या घटनांची पुनरावृत्ती होत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे सचिव सुधाकर टाक यांनी केला़ इंदौर आणि सोनपेठ येथे शासनाच्या धोरणाला कंटाळून दोन सुवर्णकारांनी आत्महत्या केल्याचे त्यांनी सांगितले़ देशातील सोन्या-चांदीच्या मल्टीनॅशनल शोरूम आणि कंपन्यांमध्ये अनेक मंत्र्यांची भागिदारी असून ते शोरूम चालले पाहिजेत म्हणून सुवर्णकारांना वेठीस धरण्याचा केंद्र शासनाचा प्रयत्न आहे़ अबकारी करातील जाचक अटींना कंटाळून अशिक्षित सुवर्णकारांनी आपले दुकान बंद करावीत, असा शासनाचा हेतू असल्याचा आरोप सुधाकर टाक यांनी केला़ ४नवीन कायद्यानुसार सुवर्णकारांना दागिना घडविण्यासाठी सोने आखणी कारखाना, दागिन्यासाठी टिकल्या पाडण्याच्या ठिकाणी, दागिना बनविण्याच्या ठिकाणी, पॉलिश करण्याच्या ठिकाणी आणि फिनिशिंग करताना अशा अनेक ठिकाणी सोन्याच्या वजनाच्या नोंदी कराव्या लागणार आहेत़ यातून कुठे नोंद चुकली तर त्यांना तीन वर्षांपर्यंतची शिक्षा आणि आर्थिक दंड होणार आहे़