शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाचा दणका! मराठवाड्यातील ११३ महाविद्यालयांतील पदव्युत्तरचे प्रवेश रोखले

By राम शिनगारे | Updated: July 24, 2025 12:23 IST

तीन सदस्यीय समितीने तपासणी केल्यानंतर अनेक महाविद्यालयांतील बोगसपणा उघडकीस आला.

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यापरिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार अधिष्ठाता मंडळाने भौतिक सुविधा नसलेल्या चार जिल्ह्यांतील नामांकित ११३ महाविद्यालयांतील पदव्युत्तरचे प्रवेश थांबविण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. प्रवेश थांबविलेल्या महाविद्यालयांमध्ये उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मंत्री, आमदार, माजी मंत्र्यांच्या संबंधित शिक्षण संस्थांचा समावेश आहे.

प्राध्यापकांची नियुक्ती न करणे, कागदोपत्री नियुक्ती केल्यानंतर संबंधितांना वेतन न देणे, बायोमेट्रिक हजेरीसह भौतिक सुविधा नसताना पदव्युत्तर अभ्यासक्रम संबंधित महाविद्यालये चालवित होती. त्याची तीन सदस्यीय समितीने तपासणी केल्यानंतर बोगसपणा उघडकीस आला.

विद्यापीठाच्या विद्यापरिषदेसह व्यवस्थापन परिषदेने ‘नॅक’ मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांतील पदव्युत्तरचे प्रवेश थांबविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राजकीय क्षेत्रातील कार्यरत शिक्षण संस्थाचालकांनी ‘नॅक’चे कामकाज बंद असल्याचे कारण देत शासनाकडे मुदतवाढ मागितली. त्यानुसार शासनाने ‘नॅक’ नसलेल्या महाविद्यालयांना सहा महिने मुदतवाढ दिली. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने संलग्न महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या भौतिक सुविधांची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार विद्यापीठ कार्यक्षेत्राच्या बाहेरील एक सदस्य आणि कार्यक्षेत्रातील दोन अशा तीन सदस्यांची समिती पाठविण्यात आली. या समितीच्या अहवालानुसार १८७ पैकी तब्बल ११३ महाविद्यालयांत पूर्णवेळ प्राध्यापकांची नियुक्ती, नियुक्ती असेल तर त्यांना वेतन दिलेले नाही, बायोमेट्रिक व इतर सुविधा नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या महाविद्यालयांतील १०० टक्के प्रवेश थांबविण्याचा ठराव विद्यापरिषदेच्या बैठकीत मंजूर केला. त्यानुसार अधिष्ठाता मंडळाने प्रवेश थांबविलेल्यांसह प्रवेश देण्यात येणाऱ्या महाविद्यालयांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केली.

उच्च शिक्षणमंत्र्यांसह राजकीय नेत्याचा समावेशप्रवेश थांबविलेल्या महाविद्यालयांच्या संबंधित संस्थेशी संबंधित नामांकित राजकीय नेत्यांचा समावेश आहे. त्यामध्ये राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) च्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे, पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण, आमदार प्रकाश सोळंके, माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे, माजी मंत्री राजेश टोपे, जयदत्त क्षीरसागर, बसवराज पाटील, मधुकरराव चव्हाण, माजी खासदार उत्तमसिंह पवार, माजी आमदार भीमराव धोंडे यांच्यासह रमेश आडसकर, प्रभाकर पालोदकर, उद्योजक मानसिंग पवार, रंगनाथ काळे, डॉ. योगेश क्षीरसागर, रमेश पोकळे, सुभाष सारडा, राजाभाऊ देशमुख, कपिल आकात, सुधीर पाटील, प्रा. सुनील मगरे, सिद्धांत गाडे, तुषार शिसोदे यांच्यासह इतर राजकीय पक्षांशी संबंधित पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

आर्थिक गणित कोलमडणारबहुतांश महाविद्यालयांना पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शुल्कातून मोठ्या प्रमाणात निधी मिळतो. आता प्रवेश थांबविण्यात आल्यामुळे विविध शिक्षण संस्थांचे आर्थिक गणित कोलमडणार असल्याचे यातून स्पष्ट झाले.

जिल्हा....................पदव्युत्तरची महाविद्यालये...............प्रवेश थांबविलेली संख्याछ. संभाजीनगर ........................७९.................................५०जालना..............................४०........................................२२बीड...................................४४......................................३१धाराशिव............................२४.......................................१०एकूण................................१८७.....................................११३

पाच दिवसांची मुदतपदव्युत्तर अभ्यासक्रमांना भौतिक सुविधा नसलेल्या ११३ महाविद्यालयांतील प्रवेश थांबवले आहेत. या महाविद्यालयांना भौतिक सुविधांची प्रतिपूर्ती करण्यासाठी पाच दिवसांची मुदत दिली आहे. या पाच दिवसांत पूर्तता न केल्यास संबंधित महाविद्यालयांतील पहिल्या सत्राचे प्रवेश पूर्णपणे बंद होतील.-डॉ. वाल्मीक सरवदे, प्र-कुलगुरु

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र