शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

भामट्यांनी २ तोळ्यांचे मंगळसूत्र लांबविले

By admin | Updated: October 22, 2014 01:20 IST

वाळूज महानगर : दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र लांबविल्याची घटना काल दुपारी घडली.

वाळूज महानगर : दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र लांबविल्याची घटना काल दुपारी बजाजनगरात घडली. मंगळसूत्र हिसकावून पसार झालेले भामटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.राजश्री गोविंद उगले (२७, रा. करमाड) या काल २० आॅक्टोबरला बजाजनगरातील नातेवाईकांना भेटण्यासाठी आल्या होत्या. काल दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास राजश्री या त्यांची जाऊ कांचन यांच्या मुलाला शाळेतून आणण्यासाठी घराबाहेर पडल्या. मुलाला शाळेतून सोबत घेतल्यानंतर घरी परतत असताना विनाक्रमांकाच्या निळ्या रंगाच्या दुचाकीवरून सुसाट वेगाने आलेल्या २२ ते २५ वयोगटातील दोन भामट्यांनी गाडीचा वेग कमी केला. यावेळी पाठीमागे काळा शर्ट परिधान करून बसलेल्या चोराने क्षणार्धात राजश्री यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. दोन्ही भामटे सुसाट वेगाने आंबेडकर चौकाच्या दिशेने पसार झाले. या अनपेक्षित प्रकारामुळे राजश्री व कांचन यांनी आरडाओरड केल्यामुळे नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत दोघेही भामटे पसार झाले होते. राजश्री उगले यांनी सायंकाळी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात ४० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र लांबविल्याची तक्रार दिली आहे. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास फौजदार व्ही.एस. जाधव करीत आहेत.