शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

बोल्डा फाटा येथे मटका अड्ड्यावर धाड

By admin | Updated: May 24, 2016 01:04 IST

आखाडा बाळापूर : अप्पर पोलिस अधीक्षकांनी तयार केलेल्या सापोनि बाचेवाड यांच्या विशेष पथकाने २३ मे रोजी दुपार १२. ३० वाजण्याच्या सुमारास बोल्डाफाटा येथील मटका अड्ड्यावर धाड टाकली

आखाडा बाळापूर : अप्पर पोलिस अधीक्षकांनी तयार केलेल्या सापोनि बाचेवाड यांच्या विशेष पथकाने २३ मे रोजी दुपार १२. ३० वाजण्याच्या सुमारास बोल्डाफाटा येथील मटका अड्ड्यावर धाड टाकली. मटक्याचे साहित्य , रोख रक्कम ८ हजार ६१० रुपये, मोबाईल जप्त केले असून, मटका खेळविणाऱ्यांसह चौघांना अटक केली आहे. कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूरसह दांडेगाव, बोल्डा, येहळेगाव या भागात गेल्या अनेक दिवसांपासून राजरोसपणे मटका सुरु आहे. पोलिसांनी या अवैध धंद्यांना सहमती असल्याची चर्चा जोरात सुरु होती. पण पोलिस अधीक्षकांच्या बदलीनंतर पोलिसांची भूमिका बदलल्याचे दिसते. अप्पर पोलिस अधीक्षकांच्या आदेशान्वये सापोनि जी. पी. बाचेवाड, सोपान लिंबेकर, पो. शि. नवनाथ शिंदे, कांबळे, महादू शिंदे, अशोक काकडे यांच्या विशेष पथकाने साध्या वेशात दुचाकीने बोल्डा फाटा येथे २३ मे रोजी सकाळी ११. ३० वाजता पोहोचले. साध्या वेशातील पोलिसांनी मटका अड्ड्यावर सापळा रचून धाड घातली. यात मटका खळविणाऱ्यांकडून मटक्याचे साहित्य व रोख ५ हजार २८० रुपये तर तेथे मटका खेळणाऱ्यांकडून २ हजार ३३० रुपये व चार मोबाईल जप्त केले आहेत. याप्रकरणी पोलिस शिपाई सोपान लिंबेकर यांच्या फिर्यादीवरुन मटका खेळविणारा शेख दस्तगीर शेख अजीज, मटका खेळणारे रामेश्वर विनकर, सखाराम विनकर, अमोल मंदाडे यांच्या विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्वजण कल्याण मिलन, मॉर्निंग बाजार, नावाचा मटका खेळतांना व खेळवितांना आढळून आल्याने त्यांना अटक केली आहे. पुढील तपास बीट जमादार बी. डी. मिजगर करीत आहेत. (वार्ताहर)