शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बळीराम पाटील, एसएफएस संघ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 01:01 IST

जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरूअसलेल्या आंतरशालेय व्हेरॉक करंडक क्रिकेट स्पर्धेत बळीराम पाटील, एस. एफ. एस., सेंट झेव्हियर्स संघ विजयी ठरले.

औरंगाबाद : जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरूअसलेल्या आंतरशालेय व्हेरॉक करंडक क्रिकेट स्पर्धेत बळीराम पाटील, एस. एफ. एस., सेंट झेव्हियर्स संघ विजयी ठरले.सकाळच्या सत्रातील पहिल्या लढतीत एसएफएसने स्टेपिंग स्टोन संघाविरुद्ध १५ षटकांत ९ बाद ८९ धावा केल्या. त्यांच्याकडून अजय सावंतने सर्वाधिक २४ व जतीन कोळीने १३ धावा केल्या. स्टेपिंग स्टोन संघाकडून मंथन पाटीलने १२ धावांत ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात स्टेपिंग स्टोन संघाने १५ षटकांत ७ बाद ८९ धावा केल्या. दोन्ही संघांच्या समान धावा झाल्यानंतर सुपर ओव्हर लढतीत एसएफएस संघाने विजय मिळवला. सुपर ओव्हरमध्ये स्टेपिंग स्टोनने ९ तर एसएफएसने १२ धावा केल्या. दुसºया लढतीत बळीराम पाटील संघाने १५ षटकांत ८ बाद १0६ धावा केल्या. त्यांच्याकडून इरफान पठाण याने ६ चौकारांसह ४१ धावा केल्या. नागसेन विद्यालयाकडून सूरज साळवे व पवन चव्हाण यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात नागसेन विद्यालयाचा संघ ७0 धावांत सर्वबाद झाला. त्यांच्याकडून कृष्णा वाघमारेने २0 व सूरज साळवे याने १४ धावा केल्या. बळीराम पाटील संघाकडून ऋतुराज विधाते याने ९ धावांत ४ गडी बाद केले. मोबीन पठाण व इरफान पठाण यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. तिसºया सामन्यात सेंट झेव्हियर्सने सेंट मोनिका संघाला ९ बाद ६३ धावांत रोखताना विजयी लक्ष्य ६.१ षटकांत एकही गडी न गमावता पूर्ण केले. त्यांच्याकडून भूषण पाटील याने ५ चौकारांसह नाबाद ३0 व अथर्व जाधवने नाबाद २0 धावा केल्या गोलंदाजीत कौस्तुभ गाययकवाडने ८ धावांत ३ व वैभव कंधारकर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.