शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

२० लाखांचा शिलकी अर्थसंकल्प मंजूर

By admin | Updated: March 19, 2016 20:23 IST

परभणी : जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा वित्ती समितीचे सभापती राजेंद्र लहाने यांनी शुक्रवारी आगामी २०१६-१७ या वर्षासाठीचा २० लाख ६४ हजार ३६७ रुपयांचा शिलकीचा अंदाजपत्रक सादर केला.

परभणी : जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा वित्ती समितीचे सभापती राजेंद्र लहाने यांनी शुक्रवारी आगामी २०१६-१७ या वर्षासाठीचा २० लाख ६४ हजार ३६७ रुपयांचा शिलकीचा अंदाजपत्रक सादर केला. हे अंदाजपत्रक सादर करीत असताना जिल्हा परिषदेच्या प्राप्त उत्पन्नातून ५३ टक्के म्हणजे १ कोटी ८७ लाख ६१ हजार १६४ रुपयांची तरतूद समाजकल्याण, ग्रामीण पाणीपुरवठा, महिला बालकल्याण आणि अपंग कल्याणच्या खर्चासाठी राखून ठेवण्याचे जाहीर करण्यात आले.येथील जिल्हा परिषदेच्या कै.बाबूराव पाटील गोरेगावकर सभागृहात १८ मार्च रोजी दुपारी २ वाजता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजेश विटेकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली. यावेळी जि.प.उपाध्यक्ष राजेंद्र लहाने, मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष डुंबरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कपाळे, सभापती दादासाहेब टेंगसे, अनिता जैस्वाल, अर्चना कऱ्हाळे, लक्ष्मीबाई पुंजारे, बी.टी.कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, एम.व्ही.करडखेलकर, मुख्य लेखा व वित्तअधिकारी किरणकुमार धोत्रे आदींची उपस्थिती होती.वित्त समितीचे सभापती तथा जि.प.उपाध्यक्ष राजेंद्र लहाने यांनी २०१५-१६ चे जिल्हा परिषदेचे सुधारित अंदाजपत्रक आणि २०१६-१७ च्या मूळ अंदाजपत्रकाचे वाचन केले. जिल्हा परिषदेला मागील वर्षीच्या शिलकेसह २०१६-१७ या वर्षात २१ कोटी ५२ लाख ३ हजार ३६७ रुपयांचे महसुली उत्पन्न मिळणार आहे. सदर उत्पन्नातून सर्व घटकांना समाविष्ट करुन आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यातून समाजकल्याण विभागासाठी २० टक्के, ग्रामीण पाणीपुरवठा विभागासाठी २० टक्के, महिला व बालकल्याण विभागासाठी १० आणि अपंग कल्याण विभागासाठी ३ टक्के अशी ५३ टक्क्यांची तरतूद राखीव ठेवण्यात आली आहे. त्यानुसार समाजकल्याण व अपंग कल्याणसाठी ८० लाख, ग्रामीण पाणीपुरवठ्यासाठी ७५ लाख, महिला व बालकल्याण विभागासाठी ५० लाख रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला. तसेच प्रशासन विभागासाठी ८१ लाख ४ हजार रुपये, शिक्षण विभागासाठी १ कोटी २० लाख, इमारत व दळणवळणासाठी ७ कोटी २५ लाख, लघुसिंचन विभागासाठी १ कोटी ६७ लाख, सार्वजनिक आरोग्यासाठी १ कोटी ५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून सर्वाधिक तरतूद करण्यात आली असून संकीर्ण विभागासाठी ४ कोटी १९ लाख ४४ हजार तर कृषी विभागासाठी १ कोटी २१ लाख ५२ हजार रुपयांची तरतूद प्रस्तावित केली आहे. २०१६-१७ या वर्षात जिल्हा परिषदेला ४० कोटी ५७ लाख ४ हजार ३६७ रुपयांचे अपेक्षित उत्पन्न आहे. त्यातून महसुली व भांडवली खर्च ४० कोटी ३६ लाख ४० हजार रुपयांचा करण्यात आला आहे. एकूण उत्पन्नाच्या तुलनेत होणाऱ्या खर्चातून २० लाख ६४ हजार ३६७ रुपये शिल्लक ठेवण्यात आली असून या अंदाजपत्रकास सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.