वाळूज महानगर : पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवडी बरोबरच त्यांचे संवर्धन करण्याची जाणीव समाजात निर्माण व्हावी, यासाठी ‘लोकमत संस्काराचे मोती ग्रीन किड्स २०१४’ कार्यक्रमांतर्गत शनिवारी दोन हजार शालेय विद्यार्थ्यांनी लेझीम व पावली खेळत वृक्षदिंडी काढून परिसर दणाणून सोडला.बजाजनगरातील रामलीला मैदानातून सकाळी ९ वाजता वृक्षदिंडी सुरू झाली. वृक्षदिंडीत बजाजनगरातील स्व.भैरोमल तनवाणी विद्यालय, राजा शिवाजी विद्यालय, शहीद भगतसिंह विद्यालय, यशश्री विद्यालय व रोज बड्स इंग्लिश स्कूलमधील जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग होता. मुलांच्या हातात पर्यावरणाचा संदेश देणारे फलक होते. ‘झाडे लावा- झाडे जगवा,’ एक मूल- एक झाड आदी घोषणा ते देत होते. रामलीला मैदान, मोहटादेवी चौक, लोकमान्य चौक, जागृत हनुमान मंदिर परिसर आदी मार्गांवरून घोषणा देत ही दिंडी निघाली. रामलीला मैदानात दिंडीचा समारोप वृक्षारोपणाने झाला. बजाजनगर- वडगावच्या सरपंच छाया कारले, उपसरपंच सुनील काळे, उद्योजक आर.के. सिंह, लोकमतचे वरिष्ठ वितरण व्यवस्थापक अलोक शर्मा, लोकमत समाचारचे वरिष्ठ उपसंपादक डॉ. रामकुमार द्विवेदी, सहा. वितरण व्यवस्थापक बाबूराव गोरे, प्राचार्य सुरेखा शिंदे, मुख्याध्यापिका राजश्री चव्हाण, प्रा. भीमदर्शन तायडे, वैभव पवार, संदीप लांडे, सुभाष पाटील, प्रा. बी.जी. गायकवाड, राजन सोमासे, मुख्याध्यापक गौतम शिंदे, एम.आर. मुंढे, एस.एस. भुकन, बी.बी. बोडखे, एम.के. लाखे, एस.सी. बरडे, व्ही.बी. ढेपते, जी.पी. अधाणे, एस.पी. गायकवाड, जितेंद्र बडजाते, एल.डी. हिवाळे, एस.बी. साबळे, एस.जे. अन्सारी, के.टी. दौड, पी.आर. वाघ, ए.बी. शिंदे, आर.आर. कांबळे, आर.आर. न्यायाधीश, अरविंद जाधव, इलाही शेख, मनीषा पाटील, बाळासाहेब कारले, भगवान देशमुख, गोंगे आदींच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण झाले. वृक्षदिंडीचे आकर्षणवृक्षदिंडीतील सहभागी विद्यार्थी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या वेशभूषेत व फेटे बांधून आणि मुली साड्या नेसून सहभागी झाल्या होत्या. दिंडी बघण्यासाठी ठिकठिकाणी वाहनचालक, नागरिक, महिला यांची गर्दी होती. विद्यार्थ्यांनी दिलेल्या गगनभेदी घोषणा व शिस्तबद्धतेचे नागरिकांनी कौतुक केले.रिमझिम पावसात वृक्षारोपणवृक्षदिंडीचा रामलीला मैदानावर समारोप होताच रिमझिम पाऊस सुरू झाला. विद्यार्थ्यांनी त्यात भिजण्याचा आनंद लुटत ढोल- ताशांच्या साथीने सुरेख नृत्य सादर केले. त्यांना उपस्थितांनीही दाद दिल्यामुळे विद्यार्थी मनसोक्तपणे पावसात भिजत होते.व्याख्यानबजाजनगरातील कामगार कल्याण भवनमध्ये पर्यावरणाचे रक्षण व वृक्षारोपणाचे महत्त्व सरपंच छाया कारले, आर. के. सिंह, प्रा. बी. जी. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. औद्योगिक क्षेत्रातून विषारी वायू हवेत मिसळत असल्यामुळे व घातक सांडपाणी उघड्यावर सोडले जात असल्यामुळे प्रदूषणाचा धोका वाढला असल्याचे प्रा. बी. जी. गायकवाड यांनी सांगितले. प्रत्येकाने एक झाड लावून ते जगविण्याचा संकल्प करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.सांस्कृतिक कार्यक्रमस्व.भैरवमल तनवाणी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण जागृतीसाठी नाटिका व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.वृक्षतोड होत असल्यामुळे पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असून, पाऊस नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत असल्याचा संदेश नाटिकेद्वारे विद्यार्थ्यांनी दिला. विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. उपस्थित पाहुणे व विद्यार्थ्यांनी त्यांना भरभरून दाद दिली. सांस्कृतिक कार्यक्रमानंतर ‘लोकमत’च्या वतीने विद्यार्थ्यांना अभ्यासाची पुस्तकेभेट देण्यात आली. यावेळी शिवाजी ढाकणे, गणपत ढाकणे, विष्णू ढाकणे, दिलीप जगताप, वितरण प्रतिनिधी धनराज चव्हाण, प्रताप शिरसाठ, प्रशांत आरक, गंगाधर पठाडे, गोविंद राजे जाधव आदी उपस्थित होते.
वृक्षदिंडीने बजाजनगर दुमदुमले...!
By admin | Updated: July 20, 2014 01:05 IST