आतापर्यंत तीन तक्रारी दाखलपुन्हा एक जणाला ३८ हजारांचा चुना : ठकसेन सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद■ भामटा स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या बजाजनगरातील एटीएम केंद्रावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे. पोलिसांनी कॅमेर्याचे फुटेज ताब्यात घेतले आहे. ■ परिसरात अशी हेराफेरी करणारा हा एकमेव भामटा असण्याची शक्यता पोलीस निरीक्षक रामेश्वर थोरात यांनी वर्तविली आहे. बजाजनगरात एटीएम कार्डाची अदलाबदल करून आतापर्यंत अनेक ग्राहकांना भामट्याने गंडा घातला असून, आतापर्यंत तिघांनी एमआयडीसी वाळूज ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत. बजाजनगरात एटीएम कार्डाची हेराफेरी करून नागरिकांना गंडा घालणारा ठकसेन एटीएम केंद्राच्या सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे. वाळूज महानगर : बजाजनगरात एटीएम कार्डाची हेराफेरी करून नागरिकांना लुटणार्याने हैदोस घातला असून, पुन्हा एकाला ३८ हजार रुपयांचा गंडा घातल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, एटीएम कार्डाची अदलाबदल करणारा ठकसेन एटीएम केंद्राच्या सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे.शंभूप्रसाद जलेश्वर प्रसाद (३0, रा. वाळूज एमआयडीसी) हे बजाजनगरातील हॉटेल वृंदावनच्या इमारतीत असलेल्या स्टेट बँक ऑफ हैदराबाद बँकेच्या एटीएम केंद्रावर आपल्या खात्यातील जमा रक्कम तपासण्यासाठी गेले होते. शंभूप्रसाद यांनी एका अनोळखी युवकाकडे एटीएम कार्ड देऊन खात्यात किती रक्कम आहे, हे बघण्यास सांगितले. त्याने त्यांचे कार्ड घेऊन यंत्रात टाकून प्रसाद यांना पासवर्ड टाकण्यास सांगितले. नंतर हातचलाखी करून कार्डाची अदलाबदल करून तो निघून गेला. नंतर भामट्याने दुसर्या एटीएम केंद्रावरून वेळोवेळी ३८ हजार रुपये काढून घेतले. दरम्यान, आपल्या खात्यावरील रक्कम अचानक कपात झाल्यामुळे शंभूप्रसाद यांनी बँकेत चौकशी केली असता त्यांना हा प्रकार लक्षात आला. शंभूप्रसाद यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर थोरात करीत आहेत. आतापर्यंत तीन तक्रारी दाखल
बजाजनगरात एटीएम कार्डची हेराफेरी सुरूच
By admin | Updated: October 22, 2015 20:58 IST