शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य प्रसुतीद्वारे जन्मले ४.७५ किलो वजनाचे शिशु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 21:21 IST

औरंगाबाद : गर्भावस्थेत शिशुचे वजन अधिक असल्यास सामान्य प्रसूती होणे अवघड असते. प्रसूतीदरम्यान शिशुचे खांदे अडकण्याचा धोका असतो. त्यातून माता आणि शिशु या दोघांच्या जीवाला धोका असतो. परंतु शहरातील डॉ. घनश्याम मगर यांनी २८ वर्षीय महिलेच्या ४.७५ कलो वजनाच्या शिशुची सामान्य प्रसूती यशस्वी केली. प्रसुतीनंतर माता आणि बाळाची प्रकृती ठणठणीत असल्याचे त्यांनी सांगितले.

जोखमीची प्रसूती यशस्वी : माता आणि बाळाची प्रकृती ठणठणीतऔरंगाबाद : गर्भावस्थेत शिशुचे वजन अधिक असल्यास सामान्य प्रसूती होणे अवघड असते. प्रसूतीदरम्यान शिशुचे खांदे अडकण्याचा धोका असतो. त्यातून माता आणि शिशु या दोघांच्या जीवाला धोका असतो. परंतु शहरातील डॉ. घनश्याम मगर यांनी २८ वर्षीय महिलेच्या ४.७५ कलो वजनाच्या शिशुची सामान्य प्रसूती यशस्वी केली. प्रसुतीनंतर माता आणि बाळाची प्रकृती ठणठणीत असल्याचे त्यांनी सांगितले.

सिंदोन भिंदोन तांडा येथील रहिवासी दिपाली संजय राठोड या डॉ. मगर यांच्याकडे गरोदरपणात उपचारांसाठी आल्या होत्या. तेव्हा गर्भातील शिशुचे वजन ४ किलोपेक्षा अधिक आहे, याचा अंदाज सोनोग्राफीत आला. गरोदरपणात आईच्या रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यास बाळाचे वजन वाढत जाते. अशावेळी प्रसूतीदरम्यान अडचणी येतात. बाळाचे खांदे आत अडकल्यास श्वास गुदमरून मृत्युचाही धोका असतो. अशा बाळालाही पहिले ४८ तास निरिक्षणात ठेवणे गरजेचे असते.

बाळाच्या रक्तातील साखर तपासणेही गरजेचे असते. डॉ. मगर म्हणाले,असे बाळ एक टक्क्यांपेक्षा कमी असतात. या आधीचे बाळांतपण नैसर्गिक असल्याने मातेला नैसर्गिक प्रसूतीसाठी प्रोत्साहन दिले. तिचे मनोबल वाढविले. माता आणि तिच्या नातेवाईकांशी चर्चा केल्यानंतर नैसर्गिक प्रसूती करण्याचा निर्णय घेताला. असे बाळांतपण हे आई आणि बाळासाठी अतिजोखमीचे असते. परंतु ही प्रसूती यशस्वी झाली आणि दोघांचीही प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

साधारणपणे ३ किलोपर्यंत वजनसर्वसाधारणपणे अडीच ते तीन किलोपर्यंत शिशुंचे वजन असते. परंतु मातेला मधूमेह असेल तर शिशुचे वजन अधिक होत असते. अशावेळी सामान्य प्रसूती होणे अवघड असते, असे घाटीतील प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा म्हणाले. 

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबाद