शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठातून थेट बाभळगाव...!

By admin | Updated: June 30, 2014 00:37 IST

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कक्षात बसून तज्ज्ञ शास्त्रज्ञांनी शनिवारी तालुक्यातील बाभळगाव येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कक्षात बसून तज्ज्ञ शास्त्रज्ञांनी शनिवारी तालुक्यातील बाभळगाव येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. आॅडीओ कॉन्फरन्सच्या या उपक्रमातून एकाच वेळी अनेक शेतकऱ्यांना विद्यापीठाच्या तज्ज्ञांमार्फत सल्ला दिला जात आहे.कुलगुरू डॉ.बी.व्यंकटेस्वरलू यांच्या मार्गदर्शनाखाली हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषी उपक्रम राबविण्यात येत आहे. कोरडवाहू शेती तंत्रज्ञानावर आधारित विविध पीक प्रात्यक्षिके बाभळगाव येथे राबविण्यात आली. विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा लाभ केवळ लाभार्थी शेतकऱ्यांनाच नव्हे, तर संपूर्ण गावातील शेतकऱ्यांना झाला पाहिजे, यासाठी आॅडीओ कॉन्फरन्सद्वारे हे गाव विद्यापीठाशी जोडावे, असे कुलगुरू डॉ.व्यंकटेस्वरलू यांनी सूचित केले होते. त्यानुसार कृषी विद्यापीठ आणि रिलायन्स फाऊंडेशन यांच्या वतीने बाभळगाव येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ५५ ते ६० शेतकरी या मेळाव्यात सहभागी झाले होते. आपली कामे आटोपून निवांत वेळेत म्हणजे सायंकाळी हा मेळावा घेण्यात आला. डॉ.एल.बी. चौलवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या मेळाव्यात शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.आनंद गोरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माऊली पारधे, विद्यापीठाचे डॉ.एल.बी. चौलवार, डॉ.आनंद गोरे, रिलायन्स फाऊंडेशनचे दीपक केकान, निलेश डंबारे, अमोल मोते यांनी परिश्रम घेतले. उपक्रमाबद्दल ज्ञानोबा पारधे, विठ्ठल पारधे, गुलाब दळवे, विजय घोरपडे, कैलास धुमाळ, उत्तम दळवे, ज्ञानोबा दळवे आदींनी समाधानकारक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)आतापर्यंत २२ कार्यशाळा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने आतापर्यंत २२ ठिकाणी अशा प्रकारे आॅडीओ कॉन्फरन्स आयोजित करुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. पाथरी तालुक्यातील देवनांद्रा, सिमूरगव्हाण, देगाव, खडी (ता.पालम), मालेगाव (ता.पूर्णा), चारठाणा (जिंतूर), बांदरवाडा, हट्टा (ता.सेलू), झरी (ता.परभणी) आदी ठिकाणी हे मेळावे झाले आहेत.कापसामध्ये लागवडीचे अंतर काय असावे, अन्नद्रव्य व्यवस्थापन, खतांचा कार्यक्षम वापर, सूक्ष्म मूलद्रव्यांचा वापर, कीड व रोगांच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय, जलसंधारण सरी, संरक्षित सिंचन, तणनाशकाचा वापर याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.